ऐसपैस 9-सीटर कॉन्फिगरेशन व प्रीमिअम इंटिरिअर्स
9.47 लाख रुपये (एक्स-शोरूम मुंबई) किंमत
मुंबई,- महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एमअँडएम लि.) या 20.7 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या कंपनीने ऐसपैस अंतर्भाग व गाडी चालवण्याचा सुखद अनुभव देणारी अशी प्रीमिअम व ठसठशीत एसयूव्ही खरेदी करून जीवनशैली उंचवण्याची इच्छा असलेल्या चोखंदळ ग्राहकांसाठी विशेषतः TUV300 PLUS दाखल केल्याचे आज जाहीर केले.
9.47 लाख रुपये (एक्स-शोरूम मुंबई) असलेली TUV300 PLUS भारतीय ऑटो क्षेत्रातील 10 लाख रुपयांखालील, समकालीन, शक्तिशाली व लवचिक 9-सीटर एसयूव्हीची कमतरता भरून काढणार आहे. TUV300 PLUS मध्ये 2.2 लिटर mHAWKD120 इंजिन बसवले असून त्याची क्षमता 88 kW (120 BHP) आहे. त्यामध्ये हायवेवर गाडी चालवण्याचा आनंद मिळण्यासाठी 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. ठसठशीत डिझाइन व एसयूव्हीची ऐट यामुळे ही गाडी अतिशय स्टायलिश व शक्तिशाली दिसते. पिनिनफेरिना या इटालियन डिझाइन हाउसने अंतर्भागाचे डिझाइन केले आहे व फॉक्स लेदर सीट्समुळे TUV300 PLUS प्रीमिअम वाटते. त्यामध्ये विविध प्रकारची हाय-टेक वैशिष्ट्ये आहेत, जशी 17.8 सेमी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम व जीपीएस नेव्हिगेशन आणि इको मोड, मायक्रो हायब्रिड टेक्नालॉजी.
महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे सेल्स व मार्केटिंग – ऑटोमोटिव्ह सेक्टर, प्रमुख वीजय राम नाकरा यांच्या मते, “सप्टेंबर 2015 मध्ये दाखल केल्यापासून TUV300 अतिशय यशस्वी ठरली आहे आणि सध्या 80,000 गाड्या रस्त्यावर धावत आहेत. आता, अधिक जागा व पॉवर असलेली एसयूव्ही खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी आम्ही TUV300 PLUS दाखल करत आहोत. आकांक्षा व जीवनशैली यांना साजेशी एसयूव्ही हवी असलेल्या ग्राहकांना TUV300 PLUS निश्चितच आवडेल.”
TUV300 PLUS विषयी
पॉवरच्या बाबत प्लस
TUV300 PLUS मध्ये सिद्ध झालेले व विश्वासार्ह mHAWKD120 इंजिन असून, ते शहरातील वाहतुकीत व हायवेवर 88 kW (120 BHP) पॉवर, 280 Nm टॉर्क व 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनने गाडी चालवण्याचे बळ देते.
जागेच्या बाबतीत प्लस
TUV300 PLUS ऐसपैस व आरामदायी एसयूव्ही असून तिच्यामध्ये 9 जण बसू शकतात, तसेच मागच्या सीट बंद करून ठेवता येतात व त्यामुळे सामान ठेवण्यासाठी मोठी जागा मिळते.
एसयूव्ही कोशंटच्या बाबतीत प्लस
TUV300 PLUS ठसठशीत रूप, मोठे टायर (लांबी 4400 मिमी, रुंदी 1835 मिमी व उंची 1812 मिमी) यामुळे शक्तिशाली व स्टायलिश दिसते आणि आक्रमक फ्रंट ग्रिल, लार्ज अलॉय व्हील्स (215/70 R16) व रिअर व्हील ड्राइव्हमुळे ती खऱ्या अर्थी एसयूव्ही दिसते.
आरामदायीपणा व प्रीमिअमनेस प्लस
कुशन सस्पेन्शन टेक्नालॉजीचा वापर करणारी TUV300 PLUS सर्व प्रकारच्या रस्त्यावर उत्तम अनुभव देते. पिनिनफेरिना या इटालियन डिझाइन हाउसने अंतर्भागाचे डिझाइन केले आहे व फॉक्स लेदर सीट्समुळे TUV300 PLUS अधिक प्रीमिअम दिसते. गाडीमध्ये स्टीअरिंग माउंटेड ऑडिओ व फोन कंट्रोल, रिअर डीफॉगर व वॉश अँड वाइप, ड्रायव्हरची सीट उंच-खाली करण्याची सुविधा, पुढच्या रांगेसाठी आर्मरेस्ट, ड्रायव्हरच्या सीटखाली सोयीचा स्टोअरेज ट्रे आणि लीड-मी-टू-व्हेइकल व फॉलो-मी-होम-हेडलॅम्प आहेत.
तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्लस
TUV300 PLUS मध्ये विविध प्रकारची हाय-टेक वैशिष्ट्ये आहेत, जशी 17.8 सेमी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम व जीपीएस नेव्हिगेशन आणि 4 स्पीकर्स + 2 ट्वीटर्स, ब्लुसेन्स अॅप, इको मोड, मायक्रो हायब्रिड टेक्नालॉजी, ब्रेक एनर्जी रीजनरेशन टेक्नालॉजी, इंटेलिपार्क रिव्हर्स असिस्ट, एसी इको मोड व ड्रायव्हर इन्फर्मेशन सिस्टीम.
सुरक्षेच्या बाबतीत प्लस
TUV300 PLUS मध्ये स्कॉर्पिओपासून केलेले चासिस व मजबूत, उच्च क्षमतेची स्टील बॉडी आहे. त्यामध्ये ड्युएल-एअरबॅग्स व इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशनसह एबीएसही आहे. तसेच, पॅनिक ब्रेकिंगच्या वेळी हझार्ड लाइटही सुरू होतात.
आकर्षक आर्थिक पर्याय
TUV300 PLUS बरोबर ग्राहकांना साजेसा आर्थिक पर्यायही उपलब्ध होणार असून डाउनपेमेंट अगदी कमी असेल व ईएमआय 11,999 रुपये इतका कमी असेल.
आकर्षक सर्व्हिस प्लान्स
TUV300 PLUS बरोबर कस्टमाइज्ड एएमसी पर्याय मिळणार असून, त्यांची सुरुवात 0.31/km रुपयांपासून आहे व पूर्णतः मनःशांती मिळण्यासाठी विस्तारित शिल्ड वॉरंटी (5 वर्षांपर्यंत) आहे.
झटपट सर्व्हिस व टर्नअराउंड कालावधी
ग्राहकांच्या सोयीपेक्षा महत्त्वाचे काहीच नाही. ग्राहकांना सुरळीत सर्व्हिस देण्यासाठी कार्यक्षम सर्व्हिसिंग टीम झटपट सेवा देते. ग्राहकांना पाच आकर्षक रंगांतून त्यांच्या पसंतीच्या रंगाची निवड करता येईल – बोल्ड ब्लॅक, मॅजेस्टिक सिल्व्हर, डायनॅमो रेड, ग्लेशिअर व्हाइट व मोल्टन ऑरेंज आणि तीन प्रकार उपलब्ध आहेत – P4, P6 and P8.