महिन्यात देशांतर्गत विक्रीमध्ये 50% वाढ
मुंबई– 19 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या, महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या फार्म इक्विपमेंट सेक्टरने (एफईएस) मार्च 2018 मधील ट्रॅक्टरविक्रीची आकडेवारी आज जाहीर केली.
मार्च 2018 मध्ये देशांतर्गत विक्री 26,958 युनिटची झाली, तर मार्च 2017 मध्ये ती 17,973 युनिट होती. फेब्रुवारी 2018 मध्ये एकूण ट्रॅक्टरविक्री (देशांतर्गत + निर्यात) 28,277 युनिट इतकी झाली, तर गेल्या वर्षी याच काळात ती 19,337 युनिट होती. फेब्रुवारीमध्ये 1, 319युनिटची निर्यात करण्यात आली.
डिसेंबरमधील कामगिरीविषयी बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या फार्म इक्विपमेंट अध्यक्ष राजेश जेजुरीकर यांनी सांगितले, “आम्ही 2018 या संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये 3 लाखांहून अधिक ट्रॅक्टरची विक्री करून नवा मैलाचा टप्पा निर्माण केला. मार्च 2018 मध्ये 26,958 ट्रॅक्टरची देशांतर्गत विक्री झाली. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ही संख्या 50 टक्के अधिक आहे. चौथ्या तिमाहीमध्ये चांगली गती मिळाली आहे आणि ती नव्या वर्षातही कायम राहील, अशी अपेक्षा आहे. निर्यातीच्या बाबतीत आम्ही महिन्यात 1,319 ट्रॅक्टरची विक्री केली.”