हॅलो या भारतातील आघाडीच्या सोशल मीडिया सुविधेने #अँटिडेंग्यू या अभियानाची यशस्वी सांगता केली आहे. हे अभियान सुरू झाल्यापासून 12 दिवसांमध्ये या अभियानाने 150 दशलक्षहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. हॅलो केअर उपक्रमांचा भाग म्हणून, #डेगू से मुक्ति (हिंदी), #ਡੇਂਗੂ ਮੁਕਤ ਭਾਰਤ (पंजाबी) या हॅशटॅगचा वापर करून, हॅलोवर उपलब्ध असणाऱ्या सर्व 14 भारतीय भाषांमध्ये डेंग्यूच्या तापाविषयी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी 14 ऑक्टोबर रोजी इन–अॅप अभियान सुरू करण्यात आले. अभियान सुरू केल्यापासून आठवडाभरातच व्हायरल झाले. त्यास 90 दशलक्ष व्ह्यूज व 6000 हून अधिक पोस्ट मिळाल्या.
50 दशलक्षहून अधिक सक्रिय युजरना उपयुक्त माहिती व दृष्टिकोन देण्याच्या प्राथमिक उद्देशाने, हॅलोने युजरना सहभागी करून घेण्यासाठी विविध इन–अॅपउपक्रमांचे आयोजन केले, जसे डेंग्यूचा सामना करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांबाबत मल्टिपल चॉइस क्विझ, नोटिफिकेशन, स्प्लॅश स्क्रीन. या उपक्रमांमुळे डेंग्यूविषयीचे अनेक गैरसमज दूर करण्यासाठी आणि युजरमध्ये जागृती करण्यासाठी मदत झाली. अभियानाचा भाग म्हणून, युजरनी विविध समस्यांवरील उपाय व डेंग्यूचा ताप बरा करण्यासाठी उपाय यावर रंजक व उपयुक्त व्हीडिओ तयार केले. बीबीसी न्यूज, एनडीटीव्ही तामिळ अशा अनेक न्यूज चॅनेलनी आणि रित्विका बशीर बशी अशा नामवंत सेलिब्रेटींनीही आपापल्या हॅलो अकाउंटवरील महत्त्वाच्या कण्टेण्टच्या मार्फत या अभियानासाठी योगदान दिले.
“#अँटिडेंग्यू अभियान हे युजर व त्यांच्या प्रियजनांच्या सुरक्षेसाठी व कल्याणासाठी हॅलोने हाती घेतलेल्या अनेक हॅलो केअर प्रकल्पांपैकी एक आहे. 50 दशलक्षहून अधिक वैविध्यपूर्ण सक्रिय युजरना सेवा देण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि त्यांच्या अधिकाधिक मूल्य देण्यासाठी माहितीच्या देवाण-घेवाण करणाऱ्या कॅम्पेन यापुढेही राबवणार आहोत,” असे हॅलोचे कण्टेण्ट ऑपरेशन्स हेड श्यामंगा बरूआह यांनी सांगितले.
50 दशलक्षहून अधिक सक्रिय युजर असणाऱ्या हॅलोची निर्मिती आपल्या स्थानिक भाषेत संवाद साधण्यास प्राधान्य देणाऱ्या भारतीय मोबाइल युजरसाठी करण्यात आली आहे. हॅलो आपल्या युजरना वापरण्यास सोप्या साधनांद्वारे विशेष व दर्जेदार कण्टेण्ट निर्माण करण्यासाठी, समविचारी युजर्सबरोबर सहभागी होण्यासाठी व नवे ट्रेंड शेअर करण्यासाठी सहाय्य करते.
हॅलो केअरविषयी:
हॅलो केअर हा हॅलो या भारतातील आघाडीच्या सोशल मीडिया सुविधेचा सामाजिक सबलीकरण उपक्रम आहे. या उपक्रमामुळे प्रत्येकाला शिक्षण, संस्कृती, समाज व स्वच्छता यावर केंद्रीत विषयांसाठी स्वयंसेवा करण्याची संधी मिळते. गरज असणाऱ्या व्यक्तींना मदत करण्याच्या हेतूने, सेलिब्रेटी, मतांवर प्रभाव घडवणारे, निर्माते व सामाजिक संस्था यांना एकत्र आणून या विषयांना पाठिंबा दिला जातो.
हॅलोविषयी
हॅलो ही भारतातील आघाडीची प्रादेशिक सोशल मीडिया सुविधा आहे. तुमच्या स्वतःच्या भाषेत कण्टेण्ट निर्माण व शेअर करण्याची, नव्या व ट्रेंडिंग बातम्यांविषयी माहिती मिळवण्याची, तसेच जास्तीत जास्त लोकांशी जोडलेले राहण्याची सोय देऊन, तुमच्या जीवनामध्ये रंग आणणे आणि सर्वांना एकत्र आणणे, हे हॅलोचे उद्दिष्ट आहे. हिंदी, तेलुगु, मल्याळम यासह 14 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असणारे हॅलो 2018 मध्ये गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोड करण्यात आलेल्या आघाडीच्या अॅपमध्ये समाविष्ट होते. हॅलोचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे व हॅलो आयओएस व अँड्रॉइड यासाठी अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, मलेशिया, सौदी अरेबिया, यूएई, ओमान, कुवेत, कतार, नेपाळ, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका व बांगलादेश येथे उपलब्ध आहे