सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी युजर्सना २०० हेल्मेट्सचे वाटप
आयपीएस श्री. सुरेंद्रनाथ देशमुख व क्विक राईडचे रिजनल हेड श्री. अमित कौरव यांची उपस्थिती
पुणे,: भारतातील आघाडीचे कार आणि बाईक-पूलिंग अप्लिकेशन क्विक राईडने त्यांच्या पहिल्या बाइकपूल आणि कारपूल रिवॉर्ड्स”चे पुण्यात आयोजन केले होते. पुण्यातील क्विक राईडच्या जबाबदार, जागरूक आणि कायम क्विक राईड सुविधेचा लाभ घेणाऱ्या बाईक आणि कार पूलर्ससाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. नुकतीच क्विक राईडवरील रजिस्टर्ड युजर्सची संख्या २.५ मिलियन्सवर पोहोचली आहे. बंगलोर, मुंबई, दिल्ली-एनसीआर, पुणे, हैदराबाद, चेन्नई, कोची आणि कोलकाता याठिकाणचे लोक मोठ्या संख्येने या सुविधेचा लाभ घेत आहेत. या बंगलोर स्थित स्टार्ट-अपची सुरुवात २०१५ साली झाली आणि आज हे देशातील सर्वात मोठे कारपूलिंग नेटवर्क बनले आहे.
क्विक राईडचे हे आजवरचे पहिले बाइकपूल आणि कारपूल रिवॉर्ड्स आहेत. यामध्ये त्यांच्या युजर्सना पुण्यातील गाड्यांमुळे होणारे प्रदूषण आणि रस्त्यांवरील गाड्यांची गर्दी कमी करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल बक्षीस दिले गेले. यामध्ये टॉप बाईक व कार पूलर्स निवडले गेले, त्याचबरोबरीने प्रवासात सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले जावे यासाठी क्विक राईडतर्फे रायडर्सना २०० हेल्मेट्सचे वाटप केले गेले. या कार्यक्रमाला आयपीएस श्री. सुरेंद्रनाथ देशमुख व क्विक राईडचे रिजनल हेड श्री. अमित कौरव उपस्थित होते.
बाइकपूल आणि कारपूल हा नोकरी, व्यवसाय करणाऱ्या प्रोफेशनल्ससाठी पैसे आणि वेळ या दोन्हींची बचत करणारा मार्ग असल्यामुळे यांचा वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे. पुणे हे कॉर्पोरेट्ससाठी सर्वाधिक पसंतीचे शहर बनलेले असल्यामुळे याठिकाणी रस्त्यांवर वाहनांची गर्दी कमीत कमी असावी यादृष्टीने लोकांना दरदिवशी कामावर जाताना कारपूल आणि बाइकपूल करण्यास प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
क्विक राईडच्या सुविधेचा वापर नियमितपणे करणाऱ्या लोकांचा तसेच या अप्लिकेशनला सहकार्य करणाऱ्या टेक पार्क्स व कोर्पोरेट्सचा सन्मान केला जावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अधिक चांगले व पर्यावरणस्नेही भविष्य निर्माण करण्यात या सर्वांकडून क्विक राईडला दिली जात असलेली साथ अतिशय मोलाची आहे.
सध्या पुण्यात जागा मर्यादित आणि खाजगी वाहनांच्या संख्येत वाढ अशी समस्या निर्माण झाली आहे. खाजगी वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे रस्त्यांवरील गर्दी वाढत आहे. वाहनांची गर्दी आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी योगदान देण्यास इच्छुक, जागरूक नागरिकांचा समुदाय निर्माण केला जावा हे क्विक राईडचे उद्धिष्ट आहे.
क्विक राईड
क्विक राईड हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय राईड-शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. देशातील सर्व महानगरांमध्ये कारपूलिंग क्रांती घडवून आणण्यात क्विक राईड आघाडीवर आहे. सर्वात मोठ्या १० पैकी ८ आयटी कंपन्या क्विक राईड वापरत असून इच्छित ठिकाणी वेळेवर आणि सुरक्षित पोहोचण्यासाठी हा विश्वसनीय प्लॅटफॉर्म असल्याचे या कंपन्या मानतात. क्विक राईडची स्थापना २०१४ साली झाली. आज हा भारतातील सर्वाधिक वेगाने वाढत असलेला कारपूलिंग समुदाय बनला आहे