पुणे – कल्याण ज्वेलर्सने चित्रपट अभिनेत्री पूजा सावंत यांची महाराष्ट्र राज्याची प्रादेशिक अम्बेसिडर आणि इन्फ्लुएन्सर म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. ही अभिनेत्री कल्याण ज्वेलर्सची स्थानिक अभियान तसेच प्रमोशन्समध्ये झळकणार आहे.
कल्याण ज्वेलर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय रघुरामन म्हणाले, ‘महाराष्ट्रासाठी प्रादेशिक अम्बेसिडर आणि इन्फ्लुएन्सर म्हणून पूजा सावंत यांची नियुक्ती झाल्यासा आम्हाला आनंद आहे. पूजा यांनी कल्याण ज्वेलर्सप्रमाणे आपल्या कठोर मेहनतीतून स्वतःचा मार्ग आखला आहे. महाराष्ट्रासाठी आम्ही महत्त्वाकांक्षी विस्तार योजना आखल्या असून ते महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी एक आहे. आम्ही लवकरच मुहूर्त ब्रँडअंतर्गत स्थानिक दागिने उपलब्ध करत आमची श्रेणी विस्तारणार आहोत. पूजा या स्टाइल आयकॉन म्हणून उदयास आल्या असून तरुण ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि ब्रँडची प्रतिष्ठा विस्तारण्यासाठी त्यांची लक्षणीय मदत होईल.’
पूजा सावंत कल्याण ज्वेलर्सच्या महाराष्ट्रभरातील दालनांमध्ये ग्राहक संवाद उपक्रमांचा भाग असतील. त्याशिवाय त्या टेकसॅव्ही, डिजिटल पातळीवर सक्रिय असलेल्या तरुण ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनीतर्फे तयार करण्यात येणाऱ्या स्थानिक कम्युनिकेशन अभियानांमध्ये लक्षणीयरीत्या सहभागी होतील.
पूजा सावंत म्हणाल्या, ‘कल्याण ज्वेलर्स हा प्रसिद्ध ब्रँड आहे आणि कल्याण कुटुंबाचा भाग होताना मला आनंद होत आहे. मी स्वतः कल्याण ज्वेलरीच्या मोहक दागिन्यांची चाहती आहे आणि खरंतर त्यांच्या सर्जनशील अभियांनामुळेच मी या ब्रँडकडे आकर्षित झाले. कंपनीबरोबर काम करण्यासाठी आणि त्यांच्या स्थानिक अभियानांचा भाग होण्यासाठी मी उत्सुक आहे.’
पूजा सावंत नव्या हंगामातील कल्याण ज्वेलर्सच्या अभियानामध्ये झळकणार आहेत. अमिताभ बच्चन, जया बच्चन, कतरिना कैफ, श्वेता बच्चन नंदा यांसारखे बॉलिवूड सेलिब्रेटीज आमच्या ब्रँडचा जागतिक चेहरा असून ते ब्रँडच्या व्यापक कम्युनिकेशन्सचा भाग असतील, तर दक्षिणेकडे प्रभू (तमिळ नाडू), नागार्जुन (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा), शिवराज कुमार (कर्नाटक), मंजू वारियर (केरळ) हे राज्याशी संबंधित अभियानांमध्ये दिसतील.
कंपनीने कायम भारतभरात नवी दालने सुरू करून विस्तार करण्यावर भर दिला आहे. २०१८- १९ या आर्थिक वर्षात कंपनीने बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम आणि छत्तीसगढ या राज्यांत नवी दालने सुरू केली. कंपनीने यूएई, कुवेत, कतार आणि ओमान यांद्वारे पश्चिम आशियात मजबत अस्तित्व प्रस्थापित केले आहे. आज कंपनीच्या वितरण नेटवर्कमध्ये १३७ मोठ्या दालनांचा तसेच ६५० माय कल्याण ग्राहक सेवा दालनांचा समावेश आहे.
कल्याण ज्वेलर्सबद्दल
केरळ राज्यातील थिसूर येथे मुख्यालय असलेले कल्याण ज्वेलर्स हे भारतातील सर्वात मोठ्या दागिने उत्पादक आणि वितरकांपैकी एक आहेत. कंपनी गेल्या शतकभरापासून देशातील वस्त्रोद्योग ट्रेडिंग, वितरण आणि हाउक व्यापार क्षेत्रात कार्यरत आहे. १९९३ मध्ये दागिन्यांचे पहिले दालन सुरू केल्यापासून कल्याण ज्वेलर्स भारतीय बाजारपेठेत गेल्या दोन दशकांपासून कार्यरत आहे. कंपनीने दर्जा, पारदर्शकता, किंमती आणि नाविन्य यांमध्ये नवे मापदंड तयार केले आहेत. कल्याण ज्वेलर्सद्वारे ग्राहकांच्या अनोख्या गरजा पूर्ण करणारे सोने, हिरे आणि प्रेशियस स्टोन्समधील पारंपरिक व अत्याधुनिक दागिने तयार करण्यात येतात. कल्याण ज्वेलर्सची भारत आणि पश्चिम आशियात मिळून १३७ दालने कार्यरत आहेत.