गुरुग्राम – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने आज चंदीगढ, जयपूर, दिल्ली आणि गुरुग्राम येथील काही ग्राहकांना सीबी३००आरच्या किल्ल्या सुपूर्त करत या गाडीचे देशभरात वितरण करायला प्रारंभ केला. होंडाने १६ स्वतंत्र अक्सेसरीज आणि प्रीमियम, प्रोटेक्शन, स्टँडर्ड आणि स्पोर्ट्स हे चार कस्टमाइज्ड किटही लाँच केले आहेत.
स्पोर्ट्स रोडस्टर ते साध्यासुध्या प्रवासाचे खेळकर सफरीत रुपांतर करणारी सीबी३००आर ही बाइक चालवण्याचा पुरेपूर आनंद देणारी आहे. कमीत कमी बॉडीवर्क, हलक्या वजनाची, विस्चारित, फ्लॅट हँडलबार हे सर्व घटक सीबी३००आर च्या उत्साहवर्धक व्यक्तिमत्त्वात आणि एकंदरीत उपयुक्तपणात हातभार लावणारे आहेत.
सीबी३००आर च्या वितरणास प्रारंभ झाल्याबद्दल होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.च्या विक्री व विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘मध्यम वजनाच्या भारतीय बाइक्सप्रेमींना निओ स्पोर्ट्स कॅफे प्रेरित होंडा सीबी३००आरचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे. फेब्रुवारीत लाँच झाल्यापासून मिळत असलेल्या प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो असून अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही आमची निर्मिती योजना नव्याने तयार केली आहे.’
सीबी३००आरसाठी अधिकृत अक्सेसरीज
ग्राहकांचा सीबी३००आर बाइक मालकीचा अनुभव आणखी समृद्ध करण्यासाठी होंडाने सीबी३००आरच्या अधिकृत अक्सेसरीजची नवी श्रेणी लाँच केली आहे. या श्रेणीमध्ये १६ स्वतंत्र पर्यायी अक्सेसरीजचा समावेश आहे. ग्राहकांना ४ कस्टमाइज्ड किट्समधूनही निवड करता येणार असून हे किट त्यांच्या वेगवेगळ्या गरजा आणि पसंती लक्षात घेत तयार करण्यात आले आहेत.
होंडा सीबी३००आर मॅट अक्सिस ग्रे मेटॅलिक आणि कँडी क्रोमोस्फियर रेड या दोन आकर्षक रंगांच २.४१ लाख रुपयांना (एक्स शोरूम पॅन भारत) उपलब्ध आहे. गाडीची नोंदणी भारतभरातील विंग वर्ल्ड वितरकांकडे खुली करण्यात आली आहे.