पुण्यात भारतातील १२ व्या होंडा स्किल एनहान्समेंट सेंटरचे उद्घाटन
पुणे – तरुणांना कौशल्य विकासाचे जास्त पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी होंडा मोटरसायकल अड स्कूटर इंडिया प्रा. लि.ने आपल्या सीएसआर उपक्रमाअंतर्गत पुण्यातील औंध येथे असलेल्या इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये (आयटीआय) होंडा स्किल एनहान्समेंट केंद्राचे उद्घाटन केले.
उद्घाटनावेळेस राजेंद्र घुमे, संयुक्त संचालक – व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, पुणे परिसर आणि प्रकाश सायगांवकर पी. एल. प्राचार्य, सरकारी आयटीआय औंध, पुणे हे मान्यवर तसेच होंडा टुव्हीलर्सचे वरिष्ठ मान्यवर श् काझुहिरो मियानो, उपसंचालक – विक्री आणि विपणन, एचएमएसआय आणि विवेक तलुजा, प्रादेशिक प्रमुख – विक्री आणि विपणन, एचएमएसआय उपस्थित होते.
वाहन देखभाल व दुरुस्तीचे विविध पैलू तसेच व्यवसायासाठी आवश्यक कौशल्ये शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकृत व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे होंडा स्किल एनहान्समेंट केंद्राचे उद्दिष्ट आहे. त्यांना भविष्यासाठी तयार करण्यासाठी होंडातर्फे स्थापन करण्यात आलेल्या पूर्णपणे कार्यान्वित सेवा कार्यशाळेत औद्योगिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या उपक्रमाविषयी प्रदीप पांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष, ग्राहक सेवा, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. म्हणाले, ‘बीएसव्हीआय उत्सर्जन नियमांची अंतिम मुदत जवळ येत असल्यामुळे भारतीय वाहन उद्योग वेगाने बदलत आहे. त्यामुळे कुशल मनुष्यबळाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार असून तरुणांसाठी रोजगार संधी उपलब्ध होतील. होंडा आपल्या विविध सीएसआर उपक्रमांद्वारे देसभरात कौशल्य विकासाचा प्रचार करत आहे. भारतात होंडा स्किल एनहान्समेंट केंद्रांद्वारे कुशल मनुष्यबळ तयार करून आम्ही तरुणांना सक्षम करण्याचे तसेच उज्ज्वल भविष्य उभारण्यासाठी मदत करणार आहोत.’
सरकारी आयटीआय औंध, पुणे येथे उभारण्यात आलेले होंडा स्किल एनहान्समेंट केंद्र पुढे जाऊन विद्यार्थ्यांसाठी रोजगार निर्मितीही करणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर होंडाद्वारे उमेदवारांना आपले उत्पादन कारखाने आणि वितरकांकडे संधी दिली जाणार आहे.
स्किल इंडिया मिशनसाठी होंडाची सीएसआर बांधिलकी
जबाबदार कॉर्पोरेट या नात्याने होंडाने कौशल्य विकासाच्या दिशेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. वाहन उद्योगातील मागणी (विशेषतः २०२० मधील बीएसव्हीआयचे लाँच लक्षात घेता) आणि कुशल मनुष्यबळाची उपलब्धता यांतील दरी सांधण्यासाठी होंडाद्वारे देशभरात होंडा स्किल एनहान्समेंट केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. सध्या अशी १२ केंद्रे रोहतक आणि गुरुग्राम (हरियाणा), जफरपूर आणि नंदनागिरी (दिल्ली एनसीआर), भोपाळ (मध्य प्रदेश), चेन्नई आणि मदुराई (तमिळ नाडू), मीरत (उत्तर प्रदेश), कोलकाता (पश्चिम बंगाल), हैद्राबाद (कर्नाटक) आणि भिलई (छत्तीसगढ) आणि पुणे (महाराष्ट्र) येथे स्थापन करण्यात आली आहेत.