मुंबई – आयसीआयसीआय बँकेने एफडी एक्स्ट्रा ही नाविन्यपूर्ण निश्चित आणि रिकरिंग ठेवींची श्रेणी लाँच केली असून त्यामुळे ग्राहकांना विशेष फायद्यांचा लाभ घेता येणार आहे.या टर्म ठेवी ग्राहकाच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवरील गरजा आणि ध्येये, उदा – गाडी आणि घराच्या डाउन पेमेंटसाठी बचत करणे, निवृत्तीचे नियोजन, मुलांचे शिक्षण, प्रवासाच्या आकांक्षा वगैरे पूर्ण करण्यासाठी खास तयार करण्यात आल्या आहे. ठेवींची ही नवी श्रेणी ग्राहकांना पुढील काही दिवसांत उपलब्ध होणार आहे.याप्रसंगी प्रणव मिश्रा, प्रमुख – रिटेल लायबिलिटीज समूह म्हणाले, ‘कित्येक गुंतवणुकदारांसाठी निश्चित आणि रिकरिंग ठेवी त्यातील जोखीम कशीही असली, तरी गुंतवणुकीचा मूलभूत पर्याय आहेत. आर्थिक बाजारपेठांमधील अस्थिरता लक्षात घेत ग्राहकांचा टर्म ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यातला रस वाढत आहे, कारण या ठेवींच्या रुपातून आकर्षक व्याजदर, रोखीचा प्रवाहीपणा, भांडवल सुरक्षा आणि खात्रीशीर परतावे मिळतात. आमच्या ग्राहकांना टर्म ठेवींमधील त्यांच्या गुंतवणुकीचा अतिरिक्त फायदा मिळवून देण्यासाठी ‘एफडी एक्स्ट्रा’ ही निश्चित आणि रिकरिंग ठेवींची नवी श्रेणी लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे. या टर्म ठेवी ग्राहकाच्या आयुष्यातील विविध ध्येयांशी सुसंगत असून त्यामध्ये टर्म योजेद्वारे संरक्षण, म्युच्युअल फंड एसआयपीद्वारे इक्विटी बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय किंवा उच्च शिक्षण, निवृत्ती, प्रवासासारख्या गरजांसाठी नियोजन यांचा समावेश होतो.हंगामी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये निश्चित ठेवी आणि इतर बचत उत्पादनांवरील टीडीएसची (टॅक्स डिडक्टेड अट सोर्स) मर्यादा सरकारने १० हजार रुपयांवरून वाढवून ४० हजार रुपयांपर्यंत नेण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या वाढीमुळेग्राहकांना निश्चित ठेवींमध्ये जास्त गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळेल. एफडी एक्स्ट्रा उपक्रम आणि त्याला अर्थसंकल्पातील अतिरिक्त कर सवलतींची जोड मिळाल्यास ग्राहक निश्चित आणि रिकरिंग ठेवींमध्ये जास्त गुंतवणूक करतील.’
पहिल्या एफडी एक्स्ट्रा टर्म- ठेवीचे एफडी लाइफ असे नामकरण करण्यात आले आहे. यामध्ये १८ ते ५० वर्ष वयोगटातील ग्राहकांना निश्चित ठेवींद्वारे गुंतवणूक आणि ठेवीदारासाठी एक वर्ष कालावधीच्या मोफत टर्म जीवन विम्याची सुरक्षितता असा दुहेरी फायदा मिळेल. या क्षेत्रात अशा प्रकारची सुविधा पहिल्यांदाच देण्यात आली आहे, ज्यामध्ये किमान तीन लाख रुपयांपर्यंतच्या आणि किमान दोन वर्ष कालावधीच्या निश्चित ठेवीसाठी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीचा तीन लाख रुपयांपर्यंतचा मोफत विमा दिला जाणार आहे. स्पर्धात्मक व्याजदराव्यतिरिक्त ग्राहकाला एका वर्षाचे मोफत विमा कवच मिळणार आहे. या विम्याचे पुढील वर्षी नूतनीकरण करण्याचा पर्याय ग्राहकाकडे असेल.
या क्षेत्रातील अशा पहिल्याच प्रकारच्या या ठेवींचे ‘एफडी इन्व्हेस्ट’ असे नाव असून त्यामुळे ग्राहकाला आयसीआयसीआय प्रुडेन्शियल असेट मॅनेजमेंट कंपनीच्या त्यांच्या आवडीच्या म्युच्युअल फंडात ठेवींवर मिळालेले व्याज म्युच्युअल फंडाच्या मासिक सुलभ हप्त्यांमध्ये (एसआयपी) गुंतवणूक करण्यास मदत होईल. किमान दोन लाख रुपयांच्या आणि किमान एका वर्ष कालावधीच्या निश्चित ठेवीवर ‘एफडी इन्व्हेस्ट’ मुद्द्ल सुरक्षित ठेवते. त्याचबरोबर याद्वारे ग्राहकांना एफडीवर मिळणारे व्याज म्युच्युअल फंडात गुंतवण्याची संधी मिळते.
एफडी एक्स्ट्रा या निश्चित ठेवींच्या श्रेणीमधील आणखी एका आवृत्तीचे नाव ‘एफडी इन्कम’ आहे. निश्चित आणि रिकरिंग ठेवींच्या स्वरुपात हा प्रकार उपलब्ध असून त्याद्वारे ग्राहकाला मॅच्युरिटीनंतरचे उत्पन्न आपल्या ध्येयाननुसार मिळवण्याचा पर्याय दिला जातो. ग्राहकांना संपूर्ण मॅच्युरिटी रक्कम मासिक उत्पन्न म्हणून त्यांच्या पसंतीच्या कालावधीसाठी मिळवता येते. त्याशिवाय त्यांना गुंतवणुकीच्या रकमेचा ३० टक्के भाग मॅच्युरिटीवर आणि उर्वरित ७० टक्के भाग त्यांच्या पसंतीच्या कालावधीसाठई मासिक उत्पन्न म्हणून मिळवता येतो. सर्व ठेवींसाठी गुंतवणूक आणि पेआऊट टप्प्यासह कमाल एकूण कालावधी १० वर्ष आहे.
आयसीआयसी बँक ग्राहकांना निश्चित ठएवींवर इन्सटंट प्लॅटिनम क्रेडिड कार्ड मिळवून देते व त्यासाठी कोणतेही वार्षिक किंवा प्राथमिक शुल्क भरावे लागत नाही. यामुळे क्रेडिट कार्डाबाबत नवखे असणाऱ्या ग्राहकांना सहजपणे क्रेडिट कार्ड मिळते.