नवी दिल्ली : तेल, वायू, विशेष तेल आणि एडब्लू-डीईएफ यांची निर्मिती करण्यात अग्रेसर असणाऱ्या ‘नंदन पेट्रोकेमिकल लि.’ (एनपीएल) या कंपनीने भारताची पहिली महिला मोटार रेसिंग चॅम्पियन आलिशा अब्दुल्ला यांची आपल्या ‘वेलवेक्स’ ब्रॅंडच्या ‘ब्रॅण्ड अॅम्बेसेडर’पदी निवड केली आहे.
आलिशाच्या या नियुक्तीमुळे मोटारस्पोर्टस खेळातील वेग आणि ‘वेलवेक्स’ ब्रॅंडमधील ध्येय, चिकाटी, कामगिरी आणि स्पर्धात्मकता या गोष्टींची सांगड घातली जाणार आहे.
ग्राहकांच्या अधिकाधिक जवळ जाण्याचे ‘वेलवेक्स’चे उद्दिष्ट आहे. त्यानुसार वेगवेगळी ठिकाणे आणि स्थानिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या पर्यावरणपूरक प्रकल्पांमधील प्रॉडक्टसद्वारे ग्राहकांना अधिकाधिक सुविधा मिळणार आहे. उत्कृष्ट जर्मन तंत्रज्ञान, वंगणसंबंधित केलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोगांमुळे ‘एनपीएल’ने विपरीत परिस्थितीमध्येही चांगली कामगिरी साधली आहे.
“मोटारस्पोर्टची मी पॅशनेट असल्यामुळे वंगणातील उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘वेलवेक्स’ बॅंडच्या ब्रॅंड अॅम्बेसेडरपदी निवड झाल्याचा मला खूप आनंद वाटत आहे. वंगण क्षेत्रामध्ये आजवर पुरुष ब्रॅंड अॅम्बेसेडर यांचाच वरचष्मा राहिलेला होता. त्यामुळे पहिल्यांदाच माझ्या रुपाने एका महिलेची आघाडीच्या वंगण ब्रॅंडच्या ब्रॅंड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती होत आहे. ‘वेलवेक्स’ बरोबरील या नात्यामुळे दोन्ही बाजूंकडून स्पर्धात्मकता जपली जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात करण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवासाची मला प्रतीक्षा आहे.” असे मत आलिशाने व्यक्त केले.
‘एनपीएल’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. नंदन एस. आगरवाल यावेळी म्हणाले, “सर्व अडथळे आणि मर्यादांवर जो मात करतो, तसेच जो प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरा जातो तोच खरा चॅम्पियन. आलिशा आणि ‘वेलवेक्स’ची कथा अगदी सारखी आहे. ‘एनपीएल’तर्फे मी आलिशा अब्दुल्ला यांचे स्वागत करतो. ‘युथ आयकॉन’ असणारी आलिशा नव्या युगातील अल्ट्रा मॉडर्न, उच्च कामगिरी साधणाऱ्या ‘वेलवेक्स’ ब्रॅंडचे निदर्शक राहील. हा ब्रॅंड आवड, दर्जा आणि सहनशक्ती या तीन तत्त्वांना अधोरेखित करतो. आलिशाची आतापर्यंतची आयुष्यकथा साधारण अशीच असून तिने आतापर्यंत आलेल्या प्रत्येक अडथळ्यावर मात केली आहे. मोटारस्पोर्टससारख्या खेळात महिलांची संख्या खूप कमी प्रमाणात पाहायला मिळत असताना आलिशाने येथे उच्च स्थान पटकावले आहे. ‘वेलवेक्स’ आणि आलिशाचा हा संयुक्त प्रवास दोघांनाही यशाचे शिखर गाठण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आलिशाबरोबरील आमच्या या युतीमुळे मोटारस्पोर्टस या खेळाबरोबरील तसेच त्याच्याशी जोडल्या गेलेल्या लाखो चाहते आणि ग्राहकांशी नाते जोडले गेले आहे.”
केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या प्रकल्पाशी ‘वेलवेक्स’ची भागीदारी केली असून गेल्या १५ महिन्यांमध्ये आपल्या उत्पन्नामध्ये १२ पटींनी वाढ केली आहे. अखिल भारतीय पातळीवर सात उच्च दर्जाचे निर्मिती प्रकल्प उभारून विविध प्रॉडक्टसची निर्मिती करण्यात आली आहे.
‘एनपीएल’ ही कंपनी ‘एडब्लू’ची निर्मिती करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीने २०११ मध्ये पहिला एडब्लू प्रकल्प स्थापित केला होता. एडब्लू हे एक अशाप्रकारचं वंगण आहे की डिझेलवर धावणाऱ्या वाहनांसाठी वापरले जाते. त्यायोगे पर्यावरणाचे रक्षण होते. आगामी राबविल्या जाणाऱ्या ‘बीएस-६’ नियमावलीद्वारे प्रवासी तसेच व्यावसायिक वाहनांना एडब्लूचा वापर करणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे बाजारपेठेची वाढती गरज लक्षात घेऊन ‘एनपीएल’तर्फे एडब्लूची निर्मिती वाढवली जाणार आहे. एडब्लूच्या सर्वाधिक निर्मितीचा मान असणाऱ्या ‘एनपीएल’कडे या वंगणाचा दर्जा चांगला राखण्याचीही जबाबदारी आहे. साधारण ‘ए़डब्लू’ वंगणाचा वापर करणे म्हणजे ‘बीएस-६’ नियमावलीला हरताळ फासणे असून त्यामुळे पर्यावरणाची तर हानी होतेच. त्याशिवाय वाहनांचेही अपरिमित नुकसान होऊन ग्राहकांना त्यांच्या वाहनांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मोठा खर्च करावा लागतो.
नंदन पेट्रोकेम लिमिटेड :
‘नंदन पेट्रोकेम लि.’ ही तेल, वंगण आणि विशेष तेल निर्मिती करणारी कंपनी आहे. एडब्लू वंगणाच्या निर्मितीमध्ये देखील ही कंपनी आघाडीवर आहे. या कंपनीचे अस्तित्व भारताबरोबरच विदेशी बाजारपेठेमध्येही आहे. ‘अव्हिस्ता ऑईल’ (जर्मनी) आणि क्रुझ ऑटोमोटिव्ह (जर्मनी) या दोन कंपन्यांबरोबर ‘नंदन’ची भागीदारी आहे. त्याद्वारे ‘नंदन’ कंपनीने ‘वेलवेक्स’ ब्रॅंडद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन वंगण, एडब्लू, तेल, ट्रान्सफॉर्मरसाठी लागणारे तेल, द्रव पॅराफीन, रबर निर्मितीसाठी लागणाऱ्या तेलाची निर्मिती केली आहे.