पुणे-युवा कलाकार अदिती द्रविड ला रोटरी क्लब् पुणे शिवाजीनगर तर्फ़े व्यावसाइक् गुणवत्ता पुरस्काराने सम्मानित केले गेले . ह्या प्रसंगी ख्यात नाम उद्योजक मीलोन नाग (के के नाग चे अध्यक्ष ), रोटरी प्रान्तपाल रवी धोत्रे , माजी प्रान्तपाल व संगणक तज्ञ डॉ दीपक शिकारपुर अध्यक्ष अन्जली रावेतकर उपस्थित होते .
अभिनेत्री अदिती द्रविड ने “तुझ्यात जीव रंगला ” “माझ्या नव रया ची बायको ” सारख्या अनेक लोकप्रिय मलिकेत त्यानी आपला ठसा उमटवला आहे. मराठी इंडस्ट्रीत डान्सर, अभिनेत्री, गीतकार आणि गायिका म्हणून नावलौकिक मिळवलेली अभिनेत्री म्हणजे आदिती द्रविड. भूमिकेची जाण, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि नवीन शिकण्याची धडपड आदितीमध्ये जाणवते. आता ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर-महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
त्यानच्या ‘वीरांगना’ या लघुपटाला पॅरिस फिक्टिव्हा फेस्टिव्हलमध्ये सन्मानित करण्यात आले आहे. विरांगणा’ ही शॉर्टफिल्म सीमेवर धारातिर्थी पडणाऱ्या सैनिकांच्या वीरपत्नींविषयीची आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमधून ईशा निंबाळकर म्हणून लोकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणु न त्यान्चा लौकिक आहे आदितीचा नुकताच रिलिज झालेला ‘यु अॅण्ड मी’ अल्बमला सध्या चांगलाच गाजत आहे.अदितीने ‘फ्लाय हाय’ ही संस्था सुरू केली असून आपल्या ह्या संस्थेद्वारे तिने समाजोपयोगी कामं हाती घेण्याचा संकल्प केला आहे.नुक तंच तिने पुण्याजवळच्या किर्कवाडीमधल्या ज्ञानज्योती विद्यामंदिर शाळेतल्यामुलींसाठी १५० सॅनिटरी नॅपकिन असलेलं स्वयंचलित मशीन दान केले आहे.