‘स्टार प्रवाह’वर १० ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या ‘नकुशी’ या मालिकेने अल्पावधीतच टीव्ही रसिकांच्या मनात घर केले असून, या मालिकेत मोठ्या ‘नकुशी’ची भूमिका प्रसिद्धी किशोर आयलवार ही वैदर्भीय कलावंत साकारणार आहे.
२० ऑक्टोबरच्या भागापासून प्रसिद्धी ‘नकुशी’ची मुख्य भूमिका साकारणार आहे ही मालिका स्टार प्रवाहवर रात्री १० वाजता प्रदर्शित होणार आहे, व दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता आणि सायंकाळी ५ वाजता या भागांचे पुनर्प्रक्षेपण होणार आहे.मूळची नागपूरकर असलेल्या प्रसिद्धीने यापूर्वी ‘ते दोन दिवस’ या चित्रपटात मुख्य व्यक्तिरेखा साकारली असून, आता ती टीव्ही मालिकेत पदार्पण करीत आहे.