पुणे- पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात सलाम पुणे प्रस्तुत मारमगुप्पी गाण्याने कल्ला केला.. होय , या गाण्याचे प्रथम प्रदर्शन येथे झाले . मुलींच्या छेडछाडी विरोधात एकीचा संदेश देणाऱ्या या गाण्याचे रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त स्वागत केले .
भाजपचे नगरसेवक गोपाळराव चिंतल तसेच अनिल सातपुते , नितीन हंबीर ,डॉ.क्रांती हंबीर , अॅड.एकनाथ जावीर ,प्रदीप मुळे, व्होरा वकील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .
गाण्याचा नायक अभिनेता मयूर लोणकर , सलाम पुणेचे अध्यक्ष निर्माते शरद लोणकर,संगीतकार आदी रामचंद्र ,पत्रकार हरीश शर्मा,अभिनेता प्रशांत बोगम ,भाजप चित्रपट आघाडीच्या प्रीती व्हिक्टर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते . विशेषतः तरुणाई ला आवडणारे हे गाणे लवकरच मराठी संगीत वाहिन्यांवरून प्रदर्शित होणार आहे . पहा आणि ऐका .. हे गाणे आहे तरी कसे ?