गायिका बेला शेंडे, गणेश कुलकर्णी, केदार कुलकर्णी यांना ‘युवा’ पुरस्कार
पुणे : शुक्ल यजुर्वेदिय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियानाच्या (युवा) अकराव्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रकांत जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ’युवा उद्योजक पुरस्कार’ महाभृंगराज तेल कंपनीचे गणेश कुलकर्णी आणि केदार कुलकर्णी यांना, सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत ’सृजन युवा पुरस्कार’ गायिका बेला शेंडे यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती ‘युवा’चे श्रीकांत जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सृजन आर्ट गॅलरीचे चारुहास पंडित, मंजुषा वैद्य, तृप्ती नानल, मिलींद दार्वेकर आदी उपस्थित होते.
हा ‘युवा’ पुरस्कार वितरण सोहळा येत्या शुक्रवारी (दि. १८ ऑक्टोबर २०१९) सायंकाळी ५.३० वाजता स. प. महाविद्यालयाजवळील टिळक स्मारक मंदिरात होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक श्रीकृष्ण चितळे, आमदार मेधा कुलकर्णी आदी उपस्थितीत राहणार आहेत. शुक्ल यजुर्वेदिय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष उमाकांत जोशी, कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.