पुणे:- किशोर कुमार यांच्या पुण्यतिथीनिमित्त सलग ३ तास त्यांच्या गाण्यांच्या बहारदार कलाकृती पुण्याचे जितेंद्र भूरूक यांनी किशोर कुमार यांच्या जन्म गावी खांडवा येथे नुकतीच सादर केली. त्यांना मध्यप्रदेशचे कॅबिनेट मंत्री कुँवर विजय शहा आणि महापौर सुभाष कोठारींनी सन्मानित करण्यात आले. मध्यप्रदेश सरकारने पहिल्यांदाच पुण्याच्या गायकाला किशोरकुमारांच्या गाण्यांसाठी सन्मानित केले.
अगर तुम ना होते…., जिंदगी एक सफर है सुहाना…, निले-निले अंबर पर…, पल पल दिल के पास अशा एक से बढकर एक गाण्यांच्या मैफिलीने रसिक श्रोत्यांच्या मनावर वेगळीच मोहोर उमटवली. यावेळी रसिकांनाही त्यांच्या आठवणींनी अश्रु अनावर झाले. जितेंद्र भूरूक यांना मेघा परांजपे यांनी साथ दिली. सेक्सोफोन वादक बाबा खान यांनी देखील किशोर कुमार सोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा देत म्हणाले कि,संगीताच्या बाबतीत ते अतिशय शिस्तप्रिय होते. त्यांच्यासोबत परदेशांमध्ये ३० पेक्षा जास्त कार्यक्रमात मी त्यांना साथ दिली. किशोर कुमार कधीही थकत नसत त्यांच्या सोबत वाद्य वाजवणारे थकून जायचे तरीही ते गात रहायचे.
कार्यक्रमादरम्यान अहमदनगरचे प्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी किशोरकुमार यांचे सुंदर चित्र रेखाटले. सेक्सोफोन वादक बाबा खान अमजद यांनी देखील आपल्या मनमोहक वादनाने रसिकांची मने जिंकून घेतली.