नुकताच अभिनेता स्वप्नील जोशीची मुख्य भूमिकेत असलेला ‘मी पण सचिन’ नावाचा सिनेमा चित्रपट गृहात प्रदर्शित झालाय .या सिनेमात नायकाबरोबर विशेष लक्षात राहिला आहे तो म्हणजे या चित्रपटातील खलनायक . तर हा खलनायक दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे अभिनेता अभिजीत खांडकेकर . अभिजीत खांडकेकर झी मराठी वरील माझ्या नवऱ्याची बायको या सुपर हिट मालिकेतून घराघरात पोचलेला . हा गुणी कलाकार त्याच्या अभिनयामुळे प्रसिद्ध आहेच पण त्याचा गोड स्वभाव , कामासाठीचा असलेला त्याचा प्रोफेशनल ऍप्रोच आणि मुख्य म्हणजे मिळालेली कोणतीही भूमिका अतिशय मेहनतीने करणे यासाठीसुद्धा तो इंडस्ट्रीमध्ये ओळखला जातॊ. मी पण सचिन मधली त्याची खलनायकाची भूमिका त्याचा आवेश या सगळ्यांना प्रेक्षकांबरोबरच चित्रपट समीक्षकांनी सुद्धा दाद दिलीय .
मूळचा गोड स्वभाव असेलेला सगळ्यांचा आवडता गॅरी म्हणजेच अभिजीतने अनेक मराठी सिनेमे आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे . एक उत्तम कलाकार आणि आजपर्यत नायकाच्या भूमिकेत दिसलेला अभिजीतने खलनायकही तेवढ्याच ताकदीने वठवला . यात महत्वाचं असं की या क्षणाला छोट्या पडद्यावर तो नायकाच्या भूमिकेत दिसत असून मोठ्या पडद्यावर तो खलनायकाच्या भुमिकेत दिसत आहे .आणि दोन्ही भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत .