मे महिन्यातील सुट्ट्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी झी टॉकीज मनोरंजनाचे नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन येत असते. गेले दशकभर झी टॉकीज वाहिनीने त्यांच्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आनंद घेता येईल अशा ‘महाराष्ट्राचे सुपरस्टार्स’ या मनोरंजनाने परिपूर्ण कार्यक्रमाची मेजवानी झी टॉकीजने दिली आहे. मराठीतले सुपरस्टार्स आणि लहान वयातच आपल्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकणारे बालकलाकार यांच्यात रंगलेली चुरस प्रेक्षणीय होती. सुपरस्टार्स v/s बालकलाकार या संकल्पनेवर आधारलेल्या ‘महाराष्ट्राचे सुपरस्टार्स’ या कार्यक्रमाचा आस्वाद रविवार २८ मे ला झी टॉकीज वर दुपारी १२.०० वा. सायंकाळी ७.०० वा. घेता येईल.
‘महाराष्ट्राचे सुपरस्टार्स’ या कार्यक्रमाचे खुमासदार निवेदन लाडका अभिनेता स्वप्नील जोशी आणि बालकलाकार पुष्कर लोणारकर यांनी केले. मानसी नाईक ने सादर केलेली गणेशवंदना, भूषण पाटीलचा टपोरी डान्स, मेघा घाडगे यांची बहारदार लावणी, अभिजित आणि प्रसेनजीत कोसंबी यांची सुश्राव्य गाणी, अतुल तोडणकर, आशिष पवार, नम्रता आवटे, मेघना एरंडे यांचे ‘रिएलिटी शो’ हे धमाल स्कीटस् अशा मनोरंजनाच्या पॅकेजने पुरेपूर हा सोहळा नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.
‘महाराष्ट्राचे सुपरस्टार्स’ या कार्यक्रमात सुपरस्टार्स वरचढ ठरले की बालकलाकारांची सरशी झाली हे रविवार २८ मे ला दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ७.०० वा. झी टॉकीज वर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.