यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या संतमाई स्किल डेव्हलपमेन्ट सेंटरमधील विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र प्रदान करताना बोलत होत्या. याप्रसंगी त्यांच्या हस्ते बेसिक फॅशन डिझायनिंग आणि बेसिक ब्युटी पार्लर या कौशल्य विकास अभ्यासक्रमांचे दोन महिने कालावधीचे या प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबतचे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलताना अनुपमा पवार म्हणाल्या की. प्रत्येक महिलेने स्वतःमधील सुप्त गुण ओळखून स्वतःचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील होणे गरजेचे आहे. खास करून बाजारपेठेची मागणी, विक्री कौशल्य या बाबी लक्षात घेऊन त्यानुसार आपल्या व्यवसायात आवश्यक ते बदल केले पाहिजेत. स्वतःला कमी न लेखता आपल्या कुटुंबाचे आपणही आर्थिक कणा बनू शकतो. हा विश्वास निर्माण करायला हवा. ‘यशस्वी’ सारख्या संस्थाच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षणाच्या द्वारे महिलांना सक्षम बनविण्याचे जे काम सुरु आहे ते निश्चितच कौतूकास्पद आहे असेही त्या म्हणाल्या.