पुणे: नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ पर्सोनेल मॅनजमेंट अर्थात एनआयपीएमचा वर्धापनदिन नुकताच एनआयपीएमच्या पुणे विभागाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.एनआयपीएम पुणे विभागाचे अध्यक्ष श्री. विश्वेश कुलकर्णी यांनी यावेळी आपल्या मनोगतात एनआयपीएममुळे राष्ट्रीय पातळीवर मनुष्यबळ व्यवस्थापकांचे प्रतिनिधित्व करणारे व्यासपीठ निर्माण झाले असून यामुळे विविध औद्योगिक कंपन्यांमधील मनुष्यबळ व्यवस्थापकांनाही आपापल्या कार्यक्षेत्रात अधिक चांगल्या प्रकारे योगदान देत आहेत.
वर्धापनदिनाच्या या कार्यक्रमात एनआयपीएम पुणे विभागाचे माजी अध्यक्ष आवर्जून उपस्थित होते.
या प्रसंगी एनआयपीएमच्या सदस्यांनी व त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या सत्कारार्थींमध्ये कु. मेघना यशवंत पाटील, अनिता आर्वीकर, अंजली आर्वीकर, सानिका दाभोळकर, मृण्मयी चितळे, रुपाली वीरकर, आदित्य काणे, डॉ. अमितकुमार गिरी, कविता कालेकर, दत्तात्रय आंबुलकर, गजानन मोरे, फारुख शेख, श्रीनिवास रायरीकर, डॉ. कॅप्टन. सी.एम.चितळे, उमेश दुगानी, केदार निबांळकर, संजय आभोरकर, योगेश वाणी, अपूर्व चौबे, उज्ज्वल भट्टाचार्जी, संतोष पणीकर,मल्हार लिंबेकर व जयकर शेट्टी यांच्यासह अमला करंदीकर, अमृता करमरकर, पवन शर्मा, प्रशांत कुलकर्णी यांनाही स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आले
याप्रसंगी डॉ. संतोष भावे यांनी २८ व २९ सप्टेंबर २०१८ रोजी एनआयपीएमच्या वतीने पुण्यात होणाऱ्या ‘नॅटकॉन’ या राष्ट्रीय परिषदेची सविस्तर माहिती सांगितली.
या वर्धापनदिन सोहळ्याला एनआयपीएमचे सर्व सदस्य आपल्या कुटुंबीयांसमवेत मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आयोजित संगीत रजनी कार्यक्रमातही उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
एनआयपीएम विषयी
एनआयपीएम ही मनुष्यबळ व्यवस्थापकांचे प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रीय स्तरावरील संस्था असून कोलकाता येथे मुख्यालय असलेल्या या संस्थेचे संपूर्ण देशभरात ५२ ठिकाणी विभागीय कार्यालये आहेत. तसेच २५ हजार हुन अधिक सदस्य असलेल्या एनआयपीएम तर्फे सातत्याने विविध औद्योगिक कंपन्यांमधील मनुष्यबळ व्यवस्थापकांसाठी अनेक विषयांवर कार्यशाळा घेतल्या जातात.