हडपसर:वंचित चे उमेदवार घनश्याम हाक्के यांच्या प्रचाराचा शुभारंभ
पुणे– हडपसर विधानसभा मतदारसंघातील वंचीत बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार घनश्याम (बापू) हाक्के यांच्या प्रचाराचा शुभारंभ हडपसर ससानेनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला .यावेळी उपस्थित लोकांना बोलताना घनश्याम हाक्के यांनी म्हटले की ,आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजपा शिवसेनेने जनतेची फसवणूकच केली आहे त्यामुळे हडपसर चा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर वंचीत आघाडीला संधी दयावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी वंचित आघाडी आणि घटक पक्ष आनि संघटनेच्या कार्यकर्ते आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पदयात्रेला सुरवात करण्यात आली .ही पदयात्रा ससाने नगर ,काळे पडळ सह परिसरातील वस्त्यांमध्ये काढण्यात आली .छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा फुले ,डॉ बाबासाहेब आंबेडकर ,राजश्री शाहू महाराज,अहिल्यादेवी होळकर ,यांच्या घोषनांनी परिसर दणाणून गेला होता .’एक संधी वंचीत आघाडीला ‘ यासारख्या घोषणा युवक कार्यकर्ते देत होते .या पदयात्रेत युवक आनी महिला कार्यकर्त्याची संख्या फार मोठ्या प्रमाणात होती यावेळी पराग बरकडे, सुफियान शेख ,तुषार आरने,किसन कोळपे, किशोर गोरे, प्रवीण करे, सुनील गडदे,विठ्ठल मदने,अतिष आलटे, हिना खान,देवा परदेशी ,चेतन शिरोळे, राजू पवार,भरत मोरे,प्रकाश देवकते, सौरभ महाडिक, इस्माईल रंगरेस आदीअसंख्य कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी होते