पुणे-कसबा विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेसकडे आपण जरूर उमेदवारी मागितली होती,पण कॉंग्रेस ने अरविंद शिंदे यांना उमेदवारी दिली ,कॉंग्रेस ची लढाई जनहितासाठी आहे या मुळे अशा काळात कॉंग्रेसला साथ दिली पाहिजे या हेतूनेच कोणताही स्वार्थ ,मागणी न करता आपण कॉंग्रेसच्या शिंदे यांच्या समवेत त्यांच्या प्रचारात कसब्यातून तसेच अन्य मतदार संघातील कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या समवेत प्रचारात उतरलो आहे. कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो भाजपचा पराभव करून त्यांचा मुखवटा खेचू शकतो कसब्याचे बोलायचे झाले तर तिथे भाजपच्या उमेदवार या महापौर आहेत त्यांची महापौर पदाची कारकीर्द आणि या कारकिर्दीत झालेले गैरप्रकार याबाबत त्यांना निश्चित जनतेच्या मतदानातून उत्तर मिळेल असा दावा देखील यावेळी कॉंग्रसचे नगरसेवक रवी धंगेकर यांनी केला आहे. पहा आणि ऐका त्यांनी नेमके काय म्हटले आहे. त्यांच्याच शब्दात ….