पुणे: भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय (A), रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे शिवाजीनगर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना या विधानसभा निवडणुकीत बहुमताने निवडून देण्यासाठी आता शिवसैनिकही सज्ज झाले आहेत. आज शिवाजीनगर गावठाण येथे झालेल्या प्रचारफेरी दरम्यान शिवसैनिकांनी एकत्र येत सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारामध्ये मध्ये सक्रीय सहभाग घेतला. आज सायंकाळी पुन्हा एकदा या भागातील शिवसैनिकांची बैठक होणार असून दोन्ही पक्षाच्या केंद्रीय व राज्यातील नेतृत्वाच्या आदेशानुसार आम्ही कामाला लागलो असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.
आज शिवाजीनगर मतदार संघातील शिवाजीनगर गावठाण येथे सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कामगार पुतळा, तोफखान, राजीव गांधी वसाहत, शिवाजीनगर गावठाण, जंगली महाराज रोड, साई पेट्रोल पंप, पुलाची वाडी या ठिकाणी सिद्धार्थ शिरोळे यांनी भेटी देत हा संपूर्ण परिसर पिंजून काढला. याबरोबरच महायुतीच्या कार्यकर्त्याबरोबर स्थानिकांच्या भेटीही घेतल्या.
सकाळपासूनच प्रचारफेरीमुळे शिवाजीनगर गावठाण भागात उत्साहाचे वातावरण होते. महिला आणि युवा वर्ग देखील यामध्ये बहुसंख्येने सहभागी झाला होता. तरुण आणि विचारी व्यक्तीमत्त्व असलेल्या सिद्धार्थ शिरोळे यांनी यावेळी अनेक विषयांवर मतदारांशी संवाद साधला. मतदारांनी देखील आपल्या अपेक्षा त्यांच्यासमोर मांडल्या. यावेळी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, नीलिमा खाडे, स्वाती लोखंडे, भावना शेळके, भाजप शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, शैलेश बडदे, शकील सय्यद, मंगेश खेडेकर, राहुल शिरोळे, राहुल सांडभोर, चंद्रजितसिंग शहाणी, तानाजीराव शिरोळे, प्रमोद शिरोळे, दिलीप घुले, मयूर शिरोळे, श्रीकांत वझे, सुनील सांडभोर, अरविंद परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.