पीएमपीएमएल बसमध्ये फिरत केला प्रचार …
पुणे – वंचित बहुजन आघाडीचे हडपसर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार घनश्याम(बापू) हाके यांनी आज फातिमानगर ते केशवनगर पीएमपीएल ने प्रवास करून हडपसर परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या .या वेळी महिलानी उभे राहून प्रवास करावा लागत असल्याचे सांगितले तर विद्यार्थ्यां नी बस वेळेत येत नसल्यामुळे शाळेत आणि महाविद्यालयाच्या वेळेत पोहचता येत नसल्याची तक्रार व्यक्त केली .तसेच ज्येष्ठ नागरिकांनी बस मधील गर्दीचा फार त्रास होत असल्याची खंत व्यक्त केली .या बरोबरच हाके यांनी व्यक्तीश सर्व प्रवाश्यांशी संवाद साधला व या वेळी वंचीत बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्याला हडपसर मधून आमदार म्हणून निवडून येण्याची संधी दयावी असे या आवाहन केले .त्याबरोबरच आपण निवडून आल्यानन्तर हडपसर परिसरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी पहिले प्राधान्य देणार असल्याचे सांगितले
तसेच महिला आणि ज्येष्ठ नगरिकासाठी स्वतंत्र बस बरोबरच बसे स ची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .
फातिमानगर येथून बसमध्ये बसल्यांनातर त्यानी सर्वप्रथम पैसे देऊन तिकीट काढून घेतले . प्रवाशयांच्या समस्येबरोबरच त्यानी पीएमपीएल च्या चालक आणि वाहक यांची विचारपूस करून अडचणी जाणून घेतल्या .आपण समाजातील वंचीत ,कामगार ,कस्टकरी यांच्या साठी कायम कार्य करीत राहणार असल्याचे या वेळी सांगितले .