पुणे-पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील मतदार हे कधी हि भ्रष्टाचारी ,फसवेगिरी करून नागरिकांना लुटणाऱ्या उमेदवाराला थारा देणार नाहीत . असा स्पष्ट दावा करत आज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय (कवाडे व गवई गट युवा मोर्चा ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला लक्ष करीत ,स्वतःच्या कामांच्या आणि लोक संपर्काच्या जोरावर आपण सहज विजयी होवू असा दावा केला .
त्यांनी आज आपल्या प्रचारार्थ लष्कर परिसरात पदयात्रा काढली .
पदयात्रेमध्ये नगरसेवक रफिक शेख, सोनाली मारणे, ,मंजूर शेख ,रशीद खिजर, माजी कॅन्टोन्मेंट सदस्या संगीत पवार, माजी कॅन्टोन्मेंट सदस्य प्रसाद केदारी, आसिफ शेख, वाहिद बियाबानी, जॉन मोहमद शेख, अमीर सय्यद, सुवर्णा उरड, धनंजय उरड,विठ्ठल थोरात आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते