पुणे-पर्वती कन्या या नावाने नवी ओळख लाभलेल्या नगरसेविका आणि पर्वती मतदार संघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी च्या उमेदवार अश्विनी नितीन कदम यांनी निवडणुकीच्या आपल्या प्रचारार्थ आज सकाळी गिरीधर भवन – ज्ञानदेव शाळा – समर्थ रामदास मंडळ – दत्त मंदिर – गजानन गॅरेज – ठाकरे कमान – एक दिल तरुण मंडळ – काळे सायकल मार्ट – व्हेईकल डेपो चौक – महाराष्ट्र मंडळ रस्ता – हुंडेकरी गॅरेज – राम मंदिर रस्ता – रांका हॉस्पिटल चौक – देवी मंदिर – झुंजार मंडळ – अरुणा आसेफ अली बाग – जागृती मंडळ – सौभाग्य मंगल कार्यालय – सातारा रस्ता – उत्सव हॉटेल चौक – नंदनवन हॉटेल – नानावटी मार्ग -अभय छाजेड यांचे संपर्क कार्यालय अशा मार्गाने प्रचार फेरी काढून मतदारांशी संवाद साधला . पदयात्रेत घरोघरी महिलांनी औक्षण करून स्वागत केले. ज्येष्ठ नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि सर्व धर्मीय समाज घटकांची सोबत हीच पर्वतीच्या सर्वांगीण विकासासाठी ऊर्जा असणार आहे. प्रचार दौऱ्यात महीलांची उपस्थिती लक्षणीय होती . त्याचप्रमाणे युवक – युवती , नागरिक यांच्यासह महाआघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .