पुणे- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त तसेच हिंदू नववर्षानिमित्त 3 किलोचे सुवर्ण उपरणे व्यंकटेश्वरा हॅचरिजचे व्यंकटेश राव यांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आले यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे,ट्रस्टचे डॉ.बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, दत्तोपंत केदारी राजाभाऊ घोडके नगरसेवक हेमंत रासने आदी मान्यवर उपस्थित होते.देवाने दिलेली हि संधी आहे आणि या संधीमुळेच एवढं करता येत आहे असं यावेळी व्यंकटेश राव यांनी सांगितले.
तसेच यावेळी गुढीपाड्वानिमित्त परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी या गणराजाच्या मंदिरातील गुढीचे सहपरिवार पूजन केले . यावेळी मोठ्या प्रमाणात भक्त उपस्थित होते