आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारअनिल जाधव यांनी साधला जनतेशी संवाद
पुणे-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल जाधव यांनी पुणे स्टेशन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली त्याचबरोबर दिवसभर येथे येणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेशी त्यांनी खुला संवाद साधला .या वेळी दलित समाजाच्या विविध समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले .
आंबेडकर भवन चा विस्तार करणार
या वेळी जाधव यांनी पुणे स्टेशन येथील आंबेडकर भवन ची जागा अपुरी असून बऱ्याच समस्या या भवन मध्ये असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी आपण निवडून आल्यानंतर आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसरातील शासकीय जागा तांब्यात घेऊन भवन चा विस्तारीकरण करणार असल्याचेसांगितले.
या वेळी येथे अभिवादनासाठी आलेल्या जनतेशी त्यांनी भेटीगाठी घेऊन प्रकाश आंबेडकर यांचे हात मजबूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले . या भेटी दरम्यान विविध सामाजिक संस्था आणि संघटना चे स्टॉल येथे होते त्यांनी उमेदवार अनिल जाधव यांचा सत्कार करून पाठीशी राहण्याचे आस्वासन दिले
या वेळी एम आय एम चे शहराध्यक्ष लियाकत शेख ,भारीपचे शहराध्यक्ष अतुल बहुले ,महिला आघाडीच्या अनिता चव्हाण ,नवनीत अहिरे ,इब्राहिम खान या सह वंचित बहुजन आघाडी आणि मित्रपक्षाचे ,संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोट्या संख्येने उपस्थित होते