पुणे-सामाजिक कार्यकर्त्या उषा काकडे यांच्या
ओएसआर व्हेंचर आणि ग्रॅविटस फाऊंडेशन निर्मित आरती एस बागडी दिग्दर्शित “उडने दो “या लघुपटाचा ट्रेलर उद्या १६ नोव्हेंबर रोजी लॉन्च करण्यात येणार असून अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्ष अमृता फडणवीस ,महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे,डिझायनर मनीष मल्होत्रा आणि अभिनेत्री लारा दत्ता, दाक्षिणात्य अभिनेत्री रेव्हथी सह बाल कलाकार यावेळी उपस्थित राहणार आहेत . बाल लैंगिंक अत्याचार वर आधारित हा लघुपट आहे.
ओएसआर व्हेंचरचे अध्यक्ष आणि ग्रॅविटस फाऊंडेशनचे संस्थापक असलेल्या उषा काकडे या २०११ पासून मुख्यत्वे बाल लैंगिक अत्याचार यावर आळा बसवण्या साठी सामाजिक स्तरावर कार्यरत आहेत.त्यांच्या फाउंडेशनच्या पुढाकारां पैकी एक ‘गुड टच बॅड टच’ बाल लैंगिक अत्याचाराचा मोठा मुद्दा हाताळत आहेत आणि आतापर्यंत ६ लाख विद्यार्थ्यां पर्यन्त संदेश प्रसारित करण्यात यशस्वी झाले आहेत ज्यापैकी २.७० लाख विद्यार्थ्यांना कवर केले आहे.निर्भया आणि कश्मीरच्या बलात्काराच्या प्रकरणांनंतर उषा काकडे यांनी ६००० सरकारी शाळांमध्ये गुड टच बैड टच चा प्रचार केला. आतापर्यंत कोणीही या कारणाविषयी बोलले नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले गेले पण , ग्रॅविटस फाऊंडेशन ने सामाजिक भान ठेवून ह्याचा योग्य प्रसार करण्याचे काम सुरु ठेवले आहे .