नवी दिल्ली- कॅनरा एचएसबीसी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने आर्थिक वर्ष 2018-19 साठीचे निकाल जाहीर केले असून, 165 कोटी रुपये निव्वळ नफा नोंदवला आहे. तसेच, संचयित तोटाही भरून काढल्याचे जाहीर केले आहे.
2018-19 आर्थिक वर्षातील कंपनीच्या कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये:
– आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये न्यू बिझनेस प्रीमिअममधील उत्पन्न 19% वाढून 1460 कोटी रुपये झाले, तर अगोदरच्या वर्षात ते 1228 कोटी रुपये होते
– गेल्या तीन वर्षांत (2015-16 ते 2018-19), कंपनीचा इंडिव्हिज्युअल न्यू बिझनेस प्रीमिअम (वेटेड प्रीमिअम इन्कम) 27% या चक्रवाढ दराने वाढला आहे, तर एकंदर उद्योगाने नोंदवलेली वाढ 16% आहे
– कंपनीच्या ग्रॉस रिटन प्रीमिअममध्ये 26% म्हणजे आर्थिक वर्ष 17-18 मधील 2781 कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष 18-19 मध्ये 3491 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली
– मार्च 31, 2019 पर्यंत आमच्या व्यवसायाची एम्बडेड व्हॅल्यू 2,575 कोटी रुपये होती
– कंपनीचे योजनांच्या बाबतीतील 13व्या महिन्यातील सातत्याचे प्रमाण 80.9%, आणि 61व्या महिन्यातील 46%, अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत दोन्हींमध्ये 3% वाढ
– कंपनीचे विम्याच्या दाव्यांच्या पूर्ततेचे (इंडिव्हिज्युअल प्लस ग्रुप) एकंदर प्रमाण 98%
– ऑपरेटिंग एक्स्पेन्स रेश्यो अगोदरच्या वर्षातील 13.3% वरून 11.8% पर्यंत सुधारले
– मार्च 31, 2019 पर्यंत अॅसेट्स अंडर मॅनेजमेंट (एयूएम) 14,854 कोटी रुपये
– मार्च 31, 2019 पर्यंत कंपनीचे सॉल्व्हन्सी मार्जिन 394%
– प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजना (पीएमजेजेबीवाय) अंतर्गत 25 लाखांहून अधिक जणांना कवच
– वेबअॅश्युअरन्स दाखल केले असून, बँकेच्या ग्राहकांना एकाच ठिकाणी, सोयीचे ऑनलाइन सोल्यूशन देण्यासाठी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या आर्थिक गरजा इन्शुरन्स सेल्फ नेटवर्क प्लॅटफॉर्मवर (आयएसएनपी) पूर्णतः डिजिटल व पेपरलेस प्रक्रियेद्वारे पूर्ण करण्यासाठी सबल केले जाणार आहे
– कंपनीने वेग व तत्परता यासाठी विशिष्ट व्यवसाय प्रक्रियांमध्ये अगदी अलीकडच्या काळात रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन (आरपीए) अवलंबले आहे
स्थापनेपासून कंपनी बँकाश्युरन्स-प्रणित मॉडेल अवलंबत आहे आणि पार्टनर बँकांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे कंपनीला बँकाश्युरन्स व्यवसायामध्ये नेहमी यश मिळाले आहे. अलीकडच्या काळात, कंपनीने डिजिटल बिझनेस वाढवण्यावर आणि डायरेक्ट सेल्स माध्यमातून व्यवसाय करण्यावरही भर दिला आहे. कंपनीने विविध प्रकारची विश्लेषणातमक व प्रोपेन्सिटी मॉडेल अवलंबली असून, त्यामुळे विविध श्रेणींमध्ये योजनांच्या बाबतीत सातत्य राखण्यास मदत झाली आहे.
वर्षभरामध्ये, कंपनीने ग्राहकांच्या गरजांच्या अनुषंगाने अनेक नवी उत्पादने सादर केली आहेत. कंपनीने ‘हेल्थ फर्स्ट प्लान’ हे पहिले आरोग्यविषयक उत्पादन दाखल केले असून त्यामार्फत आरोग्य क्षेत्रात प्रवेश केला आहे. कंपनीने ‘इन्व्हेस्ट 4जी’ हा अत्यंत किफायतशीर ऑनलाइन युनिट-लिंक्ड प्लान दाखल केला. या प्लानसाठी अलोकेशन किंवा प्रशासकीय शुल्क आकरले जात नाही. याव्यतिरिक्त, नियमित खात्रीशीर उत्पन्न देण्यासह दीर्घकालीन फायदे देण्यासाठी गॅरंटीड इन्कम प्लान व गॅरंटीड सेव्हिंग्स प्लान दाखल करण्यात आले. तसेच, कंपनीने पीओएस इझी बिमा व पीओएस बचत (पॉइंट ऑफ सेल उत्पादन) अशा मास मार्केट उत्पादनांमार्फत अधिकाधिक विस्तार करण्याच्या अनुषंगाने वितरण धोरण आखले होते.
कंपनीने आपल्या प्रक्रियांची कार्यक्षमता व उत्पादकता यांना चालना देण्यासाठी, प्रक्रिया सोपी करण्यासाठी आणि ग्राहकांना आनंद व चांगला अनुभव देण्यासाठी सातत्याने सुधारणा करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा समावेश करणे कायम राखले आहे. यासंदर्भातील काही उपक्रम पुढील आहेत:
- ग्राहकांना सुरळित व एकात्मिक पेपरलेस सेवा देण्यासाठी ऑटोमेटेड फिनान्शिअल नीड असेसमेंटसह टॅब्लेटवर आधारित विक्री प्रक्रिया आणि विस्तृत वितरण जाळे योग्य प्रकारे जोडलेले असणे
- आयव्हीआर सर्व्हिसिंग पर्यायांमुळे ग्राहकांना विविध प्रकारचे सेल्फ-सर्व्हिसिंग पर्याय उपलब्ध
- ग्राहकांना केव्हाही सेवा देण्यासाठी प्रतिसाद देईल असे ऑनलाइन मोबाइल कस्टमर पोर्टल
- डिजिटल ग्राहक श्रेणीला सेवा देण्यासाठी ट्रॅडिशनल, युनिट लिंक्ड व हेल्थ अशा विविध प्रकारच्या उत्पादनांसाठी स्पर्धात्मक उत्पादने
कंपनीचे आर्थिक निकाल जाहीर करताना, कॅनरा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कॅनरा एचएसबीसी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स लाइफ इन्शुरन्सचे अध्यक्ष आर. ए. शंकर नारायणन यांनी सांगितले, “अध्यक्ष व मोठा भागधारक म्हणून, गेल्या दहा वर्षांत बरेच बदल झाले असून, कंपनी नफा मिळवत वाढ साध्य करत आहे. आम्हा तीन पार्टनर बँकांवर ग्राहकांचा दृढ विश्वास आहे आणि त्यामुळे कंपनीला उत्पादने सादर करताना मदत झाली आहे.“
कॅनरा एचएसबीसी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स लाइफ इन्शुरन्सविषयी बोलताना, नारायणन यांनी नमूद केले, “आम्ही ग्राहक-केंद्री आहोत आणि ग्राहकांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये संरक्षण देण्यासाठी व मूल्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ग्राहकांसाठी सादर केलेली उत्पादने स्पर्धात्मक असली पाहिजेत आणि त्यांनी दीर्घ काळ मूल्य दिले पाहिजे, असे आमचे उद्दिष्ट आहे. आर्थिक समावेशकता हे केंद्र सरकारचे अतिशय महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. विस्तार करण्यासाठी आणि आमची उत्पादनेग्रामीण भागातील ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रादेशिक ग्रामीण बँकांशी सहयोग केला आहे. आमच्या पार्टनर बँकांच्या वितरणाद्वारे, आम्हाला टिअर 2 व 3 शहरांमध्ये पोहोचणे शक्य झाले आहे आणि या शहरांमध्ये व्यवसायाचा विस्तार करणे शक्य झाले आहे.“
कॅनरा एचएसबीसी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज माथुर यांनी कंपनीच्या आर्थिक निकालांविषयी बोलताना म्हटले, “गेले संपूर्ण वर्ष आमच्यासाठी एकंदर व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय चांगले होते. अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत आम्ही आकडेवारीच्या बाबतीत सातत्य राखले. प्रगतीविषयी केलेले नियोजन अमलात आणण्यासाठी आम्ही काही उपक्रम हाती घेतले होते. आमच्या कंपनीने दहा वर्षे पूर्ण केली आहेत आणि संचयित तोटा भरून काढला आहे. ग्राहकांच्या गरजांना अनुसरून उत्पादने विकसित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. पीएमजेजेबीवाय अशा पंतप्रधानांच्या योजना विमा समावेशकतेला मोठी चालना देतात. या वर्षी, आमच्या व्यवसाय प्रक्रियांमध्ये परिवर्तन आणण्यावर आम्ही भर देणार आहोत. आमच्या भागीदार बँकांना त्यांच्या उत्पादनांमध्ये आयुर्विम्याचा समावेश करता यावा म्हणून त्यांना आमच्याशी एकात्मिक करण्यासाठी आम्ही विविध पर्यायांचा वेध घेत आहोत.”
कॅनरा एचएसबीसी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडविषयी
कॅनरा एचएसबीसी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची स्थापना जून 2008 मध्ये झाली आणि ही भारतातील दोन सर्वात मोठ्या सरकारी कंपन्यांची संयुक्त मालकीची कंपनी आहे – कॅनरा बँक (हिस्सा 51%) व ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (23%) – आणि एचएसबीसी इन्शुरन्स (एशिया पॅसिफिक) होल्डिंग्स लिमिटेड (26%), एचएसबीसी या जगातील सर्वात मोठ्या बँकिंग व वित्तीय सेवा समूहाची आशियातील विमा कंपनी. कंपनीसाठी कॅनरा बँक, एचएसबीसी व ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स व भागीदार यांचे देशभरातील 10000 हून अधिक शाखांचे जाळे व अंदाजे 115 दशलक्ष ग्राहक उपलब्ध आहेत. सर्व बँकांच्या सक्षम पायाभूत सुविधांमुळे देशभर विमा उत्पादनांचे वितरण व उपलब्धता करणे शक्य होते आणि ग्राहकांसाठी मोठी सोय होते व देशातील सर्व ठिकाणी (शहरी, निम-शहरी, ग्रामीण) विमा उत्पादने पोहोचवण्यासाठी मदत होते. यामुळे देशाची संरक्षणविषयक गरज पूर्ण करण्यासाठी योगदान दिले जाते.