मुंबई– लार्सन अँड टुब्रोच्या लोणावळा येथील लीडरशीप डेव्हलपमेंट अकॅडमीला (एलडीए) इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) ग्रीन कॅम्पस सर्टिफिकेशन अंतर्गत प्रतिष्ठित गोल्ड रेटिंग प्रदान करण्यात आले आहे.
आयजीबीसी ग्रीन कॅम्पस सर्टिफिकेशनद्वारे राष्ट्रीय प्राधान्यक्रम उदा. नैसर्गिक स्त्रोतांचे जतन, उर्जा आणि पाणी कार्यक्षमतेची मागणी, अक्षय उर्जेचा वापर, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या कचऱ्याचे व्यवस्थापन, आरोग्य आणि आराम व जैववैविध्य इत्यादींवर काम करण्यासाठी आवश्यक हरित संकल्पना आणि तंत्राच्या अंमलबजावणीस प्रोत्साहन दिले जाते.
श्री. योगी श्रीराम, वरिष्ठ उपाध्यक्ष, कॉर्पोरेट एचआर, एल अँड टी म्हणाले, ‘एक जबाबदार कॉर्पोरेट या नात्याने एल अँड टी आपल्या काही शाश्वत उपक्रमांसह भारतीय कॉर्पोरेट विश्वात आदर्श पायंडा घालून देत आहे. एल अँड टी लीडरशीप डेव्हलपमेंट अकॅडमीचा (एलडीए) कॅम्पस भारतातील अभिनव कॉर्पोरेट विद्यापीठ म्हणून ओळखला जातो आणि त्याच्यासाठी सार्थ असलेले आयजीबीसीचे गोल्ड रेटिंग मिळाले आहे. हरित कॅम्पससाठी आयजीबीसी गोल्ड रेटिंग मिळाल्याचा आम्हाला अतिशय आनंद झाला आहे.’
आयजीबीसीने एलडीएचा २४ एकरांच्या लँडस्केप कॅम्पसचे आठ निकषांवर मूल्यांकन केले. प्रत्यक्ष ठिकाणचे नियोजन आणि व्यवस्थापन, शाश्वत वाहतूक, जल संवर्धन, उर्जा कार्यक्षमता, साहित्य आणि स्त्रोत व्यवस्थापन, आरोग्य आणि स्वास्थ्य, हरित शिक्षण, संशोधन व विकास यांचा त्यात समावेश होता.
येथील शुद्ध पर्यावरणाचे जतन करण्यासाठी एलडीएने कार्बन उत्सर्जनचे प्रमाण कमीत कमी राहावे म्हणून विशिष्ट धोरण, पद्धती व प्रक्रिया अवलंबल्या आहेत. सौर पॅनेल्स, सांडपाण्याचे व्यवस्थापन, वाहतुकीसाठी बॅटरीवर चालणाऱ्या कार्स, तज्ज्ञ बागकामशास्त्रज्ञांद्वारे देखरेख केली जाणारी लँडस्केप सुविधा, हरित- औषधी वनस्पती आणि फुलझाडे यांचा एलडीच्या हरित उपक्रमांत समावेश होतो.
पुण्याजवळील लोणावळ्याच्या निसर्गरम्य परिसरात वसलेल्या एलडीएमध्ये भविष्यातील नेतृत्व आणि जागतिक कॉर्पोरेट उद्योजक तयार करण्यासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. १९९७ मध्ये स्थापना झाल्यापासून एलडीएने एल अँड टी तसेच काही निवडक कॉर्पोरेट्सच्या व्यवसायांना मदत केली आहे.