पुणे- वाहतूक समस्येवर आज महापालिका सभेतील बैठकीत आज वाहतूक पोलीस उपायुक्त यांनी नगरसेवकांच्या प्रश्नांचा त्रिफळा उडविला .. ते म्हणाले .. जेवढी वाहने नो पार्किंग मध्ये लागतात .. तेवढी सारी उचलणे आम्हाला शक्य नाही.. पण जर उचललीच .. तर ती ठेवण्यासाठी तरी अधिकृत पार्किंग ची जागा कुठे आहे काय ? .. आपल्याला मराठा मोर्चाच्या संदर्भातील पोलीस बैठकीला जायचे आहे असे सांगत त्यांनी नगरसेवकांच्या अन्य साऱ्या प्रश्नांना मात्र बगल देत .. मला जिथे शक्य आहे तिथे व्हिजिट करून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेल असे ही आश्वासन त्यांनी दिले .. पहा आणि ऐका नेमके वाहतूक पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे काय म्हणाले …