पुणे :एकीकडे विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असताना सरकारी हस्तक्षेपामुळे ,उशिरा येणारी विमाने ,बंद पडणारी विमाने आणि तक्रारींचा पाऊस पडत असताना त्याकडे जाणून बुजून सरकरी व्यवस्थेकडून होणारा दुर्लक्षित कारभार यामुळे सध्याच्या काळात विमान प्रवास सुखाचाचं होईल याची शाश्वती राहिलेली नाही .थोडक्यात विमानाने प्रवास करणाऱ्यांना कोणी वाली राहिला नाही, त्यांच्या हक्काचे कोणाला सोयर सुटक राहिलेले नाही . अशा घटना वारंवार घडत आहेत आणि त्याकडे लक्ष मात्र कोणी देत नाही असे चित्र आहे .
अशीच एक घटना काल पुन्हा घडली आणि विमानतळावर घोषणाबाजी करण्याची वेळ प्रवाशांवर आली .पुण्यावरुन दुबईला जाणारे स्पाइस जेटचे SG51 विमान रविवारी रात्री ११ वाजता उड्डाण करणार होते. मात्र, तांत्रिक खराबीमुळे या विमानाचे उड्डाण रद्द करण्याता आले. त्यामुळे १८० प्रवासी रात्रभर विमानतळावर अडकून पडले. प्रशासनाकडून प्रवाश्यांसाठी काहीही व्यवस्था न केल्याने प्रवाशांना विमानतळावर झोपून रात्र काढावी लागली.
स्पाइस जेटचे SG51 हे विमान रविवारी रात्री ११ वाजता पुणे विमानतळावरुन दुबईसाठी उड्डाण घेणार होते. मात्र तांत्रिक बिघाड झाल्याने या विमानाचे उड्डाण तब्बल १२ तास लांबले. त्यामुळे विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. त्यांना रात्रभर विमानतळावर ताटकळत रहावे लागले. प्रवाशांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था न केल्याने त्यांना खाली झोपून रात्र काढावी लागली. या विमानाचे उड्डाण आज (सोमवारी) सकाळी साडेदहा वाजेपर्यंत झाले नव्हते. स्पाइस जेटच्या अधिकाऱ्यांकडून विमानाच्या उड्डाणाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान, संतप्त प्रवाशांनी विमानतळावर घोषणा देत स्पाइस जेट प्रशासनाचा निषेध केला.