पिंपळे गुरवमधील दिवाळी पहाटमध्ये रसिक मंत्रमुग्ध
आमदार लक्ष्मण जगताप सांस्कृतिक कला मंचच्या वतीने दिपावली संगीत महोत्सवाचे आयोजन
पिंपरी / प्रतिनिधी
जय जय राम कृष्ण हारी…., रुप पाहता लोचनी…, काया ही पंढरी…., ज्ञानियांचा राजा गुरु महाराज…, नाव किनारे लगाओ प्रभूजी…, मन कर मोह तू रे हरी भजन को मान रे…, आनंदाचे डोही आनंद तरंग…, देहूला जावून देह विसरावा…, आदी गीतांनी पिपळेगुरवकर संगीत रसिक मंत्रमुग्ध झाले.
पिंपळे गुरव येथील नाट्यसम्राट निळूभाऊ फुले नाट्यगृहामध्ये आमदार लक्ष्मण जगताप सांस्कृतिक कला मंचच्या वतीने दिपावली संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने हाजेरी लावली. याप्रसंगी ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, ह प्रभाग अध्यक्ष अबंरनाथ कांबळे, नगरसेवक नवनाथ जगताप, सागर अंगोळकर, नगरसेविका उषा मुंडे, माधवी राजापुरे, सीमा चौगुले, चंदा लोखंडे, माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे आदी उपस्थित होते.
नाट्यगृहामध्ये प्रथमच पं. सुधाकर चव्हाण यांनी संत एकनाथ , संत ज्ञानेश्वर, संत कबीर, संत मीराबाईंच्या संतवाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांना प्रभाकर पांडव (हार्मोनियम), नंदकिशोर ढोरे (तबला), गंभीर महाराज (पखवाज) यांनी साथसंगत केली. नामदेव तळपे यांनी सुत्रसंचलन केले.