पुणे : ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’तर्फे पुण्यातील ११ नामवंत व्यक्तींचा ‘डिझायनो २०१७’ प्रदर्शनात ‘गो ग्रीन ॲवॉर्ड्स’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अभिनवता व फेरप्रक्रिया जगताबाबतच्या डिझायनो या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन ‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन’तर्फे करण्यात आले. बालगंधर्व रंगमंदिरात तीन दिवस झालेल्या या प्रदर्शनात फेरप्रक्रिया केलेली (रीसायकल्ड) उत्पादने प्रदर्शित करण्यात आली आणि फेरप्रक्रिया, फेरवापर व वापर कमी करणे (रीसायकल, रीयूज अँड रीड्युस) याच्या महत्त्वाबाबत जनजागृतीही करण्यात आली.
पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक व ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’चे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या हस्ते गो ग्रीन ॲवॉर्ड्स या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
पुरस्कारार्थींमध्ये पुढील नामवंतांचा समावेश होता.
१) श्री. मंगेश तेंडुलकर, प्रसिद्ध हास्यचित्रकार
२) श्री. दिनकर टेमकर, उपसंचालक, पुणे विभाग, शिक्षण खाते, पुणे.
३) चंद्रकांत निनाले, सहसंचालक, एमएसबीव्हीई
४) विवेक खटावकर, प्रसिद्ध शिल्पकार व कलावंत : अंतर्रचना व सजावट
५) सौ. मंजुश्री खर्डेकर, नामवंत समाजसेवक, नगरसेविका, पुणे महापालिका
६) श्री. हारुन अत्तार, शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
७) संजय कारेकर, उप शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
८) श्री. रोहिदास एकड, अध्यक्ष, पुणे जिल्हा विज्ञान शिक्षक संघटना
९) श्री. विष्णू भेडा, प्रसिद्ध अंतर्गत रचनाकार, अध्यक्ष आयआयआयडी, पीआरसी
१०) श्री. संजय भंडारी, संचालक, आनंद कॉम्प्युटर्स
११) श्री. रवी चौधरी, अध्यक्ष, ड्रीम प्लेसमेंट्स, पुणे प्रतिष्ठान
यासंदर्भात डॉ. संजय चोरडिया म्हणाले, की आपल्या पर्यावरणाचे जतन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या या व्यक्तीमत्त्वांचा गौरव करणे आमच्यासाठी अभिमानस्पद आहे. आपण राहात असलेल्या जगावर सकारात्मक परिणाम घडवण्याच्या सर्वोत्तम मार्गांपैकी एक म्हणजे फेरप्रक्रिया. फेरप्रक्रिया ही नैसर्गिक पर्यावरण व आपण या दोघांसाठी महत्त्वाची असते. त्यामुळेच आपण त्वरित कृती केली पाहिजे, कारण आपण तयार करत असलेल्या कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्याचा या ग्रहावर नकारात्मक परिणाम होत आहे.