पुणे : माय ब्रँड बेटर आयोजित ‘इंडियन एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड्स २०१९’मध्ये सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटसला ‘बेस्ट इन्स्टिट्यूशनल ग्रुप इन महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री पूनम धिल्लन यांच्या हस्ते सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी नयना गोडांबे उपस्थित होत्या.
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या प्रगतीचा आलेख गेल्या २० वर्षात कायमच चढता राहिला आहे. विदयार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त शिक्षण देण्याचा प्रयत्न संस्थेने केला आहे. जागतिक स्तरावर शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल येथे अंमलात आणले जात असून, वैश्विक दृष्टीकोनातून शिक्षण दिले जात आहे. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्राधान्य देऊन त्यांना घडविण्यात सूर्यदत्ताचा पुढाकार आहे. या सगळ्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
गेल्या २० वर्षात संस्थेने शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल ‘इंडियन एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड्स २०१९’मध्ये महाराष्ट्रातील नामांकित शैक्षणिक संस्था म्हणून गौरव झाला आहे. एकूण ५० संस्थांचा यामध्ये गौरव करण्यात आला. यासाठी तीन महिन्यांहून अधिक काळ उत्कृष्ट संस्था निवडीची प्रक्रिया सुरु होती. नामांकन, संशोधन, सर्वेक्षण, वेबसाईट विविध पैलूंवर परीक्षण करीत ज्यूरीच्या पॅनलने ही निवड केली आहे.