सृजन सुपर 20 युथ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत समर्थ रामदास स्वमी क्रीडा मंडळ संघाला विजेतेपद
पुणे,दि 11 नोव्हेंबर 2017- एक्सेलार स्पोर्टस् अॅड एन्टरटेमेंट प्रायव्हेट लिमिटेड व पुणे जिल्हा कबड्डी संघटना यांच्या सहकार्याने ओयोजित सृजन सुपर 20युथ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत बारामती विभागात मुलींच्या गटात समर्थ रामदास स्वमी क्रीडा मंडळ संघाने बारामती क्रीडा आकादमी संघाचा पराभव करत बारामती विभागाचे विजेतेपद पटकावले.
क्रीडा संकुल, बारामती येथे सुरू असलेल्या बारामती विभागातील मुलींच्या गटात प्राजक्ता दोरगेच्या 14 गुणांच्या बळावर समर्थ रामदास स्वमी क्रीडा मंडळ संघाने बारामती क्रीडा आकादमी संघाचा 41-39 असा असा पराभव करत बारामती विभागाचे विजेतेपद पटकावले.
मुलांच्या गटात उपांत्यपुर्व गटात महाराणा क्रीडा युवा संस्था संघाने नवमहाराष्ट्र कबड्डी संघ संघाचा 32-19 असा पराभव केला. राजे उमाजी नाईक क्रीडा मंडळ संघाने हनुमान स्पर्टस् क्लब संघाचा 25-21 असा पराभव केला. तर आर.एस.एफ सासवड संघाने इगल क्लब संघाचा 30-12 असा पराभव केला तर बारामती स्पोर्टस् अकादमी संघाने सोमेश्वर न्यु क्रीडा मंडळ संघाचा 47-16 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- मुली- अंतीम फेरी
समर्थ रामदास स्वमी क्रीडा मंडळ-41(प्राजक्ता दोरगे 14, प्राजक्ता गायकवाड 10) वि.वि बारामती क्रीडा आकादमी- 39
मुले-उपांत्यपुर्व फेरी-
महाराणा क्रीडा युवा संस्था-32 वि.वि नवमहाराष्ट्र कबड्डी संघ-19
राजे उमाजी नाईक क्रीडा मंडळ-25 वि.वि हनुमान स्पर्टस् क्लब- 21
आर.एस.एफ सासवड- 30 वि.वि इगल क्लब-12
बारामती स्पोर्टस् अकादमी- 47 वि.वि सोमेश्वर न्यु क्रीडा मंडळ- 16