स्पर्धेतील आतापर्यंतचा अरुण अग्रवालचा 80 गुणांचा हायेस्ट ब्रेक
पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आणि बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या संलग्नतेने दुसऱ्या बिलियर्ड्स व 15रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद 2019 स्पर्धेत बिलियर्ड्समध्ये मुंबईच्या अरुण अग्रवाल, रयान राझमी, राजीव शर्मा यांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजय मिळवला.
पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत बिलियर्ड्समध्ये राउंड रॉबिन फेरीत अ गटात मुंबईच्या व माजी राज्य बिलियर्ड्स विजेता अरुण अग्रवालने आपला शहर सहकारी चंदू कंसोडरियाचा 3-1(44-101, 100-49, 101-57, 100(80)-05) असा पराभव करून शानदार सुरुवात केली. अरुण याने आपल्या खेळीत चौथ्या फ्रेममध्ये 80 गुणांचा ब्रेक नोंदवून आतापर्यंतच्या हायेस्ट ब्रेकची नोंद केली. तर दुसऱ्या सामन्यात अरुण याने संजीव बिजलानीचा 3-0(100-60, 100-11, 100-18) असा सहज पराभव केला. ब गटात मुंबईच्या रयान राझमीने यश रुंगताचा 3-1(78-100, 100-55, 100-33, 100-56) असा पराभव करून विजयी सलामी दिली.क गटात चुरशीच्या लढतीत पुण्याच्या शिवम अरोराने आनंद रघुवंशीचा 3-2(42-100, 96-100, 100-760, 100-91, 100-48) असा संघर्षपूर्ण पराभव केला.
आजपासून सुरु झालेल्या स्नूकरमध्ये पात्रता फेरीच्या चरणात पुण्याच्या निशाद चौघुलेने सत्चित जामगावकरचा 3-0(64-02, 57-02, 65-33) असा तर, मुंबईच्या शुभोजित रॉयने पुण्याच्या स्वप्निल बिचेचा 3-2(47-33, 42-68, 51-40, 06-46, 64-59) असा पराभव करून आगेकूच केली.
याआधी स्नूकरचे उदघाटन डेक्कन जिमखानाचे जनरल सेक्रेटरी विश्वास लोकरे, पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ सुधीर भाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाचे उदय पुंडे, वरिष्ठ स्नूकर खेळाडू उषा खंडेलवाल, डेक्कन जिमखानाचे बिलियर्ड्स विभागाचे सचिव विजय कदम, टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे, संजीव ताटके आणि सलील देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: राउंड रॉबिन: बिलियर्ड्स:
गट अ: अरुण अग्रवाल(मुंबई) वि.वि.संजीव बिजलानी(मुंबई) 3-0(100-60, 100-11, 100-18);
गट अ: चंदू कंसोदारिया(मुंबई) वि.वि.तहा खान(पुणे) 3-1(100-47, 100-52, 35-100, 102-66);
गट ब: रयान राझमी(मुंबई)वि.वि.यश रुंगता(मुंबई) 3-1(78-100, 100-55, 100-33, 100-56);
गट अ: अरुण अग्रवाल(मुंबई)वि.वि. चंदू कंसोडरिया(मुंबई) 3-1(44-101, 100-49, 101-57, 100(80)-05);
गट अ: तहा खान(पुणे)वि.वि.संजीव बिजलानी(मुंबई) 3-0(100-61, 100-27, 100-99);
गट ब: रयान राझमी(मुंबई)वि.वि.यश रुंगता(मुंबई) 3-1(78-100, 100-55, 100-33, 100-56);
गट ब: शुभम रांधे(मुंबई)वि.वि.ललित झाम(मुंबई) 3-0(100-63, 100-82, 100-95);
गट क: राजीव शर्मा(मुंबई)वि.वि.शयान राझमी(मुंबई) 3-1(100-95, 50-100, 100-61, 100-64);
गट क: शिवम अरोरा(पुणे)वि.वि.आनंद रघुवंशी(पुणे) 3-2(42-100, 96-100, 100-760, 100-91, 100-48);
गट क: रयान राझमी(मुंबई)वि.वि.ललित झाम(मुंबई) 3-0(100-31, 100-59, 100-30);
गट ड: अमित सप्रू(मुंबई)वि.वि.राजवर्धन जोशी(पुणे) 3-1(101-97, 82-100, 100-77, 101-79);
स्नूकर: पहिली पात्रता फेरी:
निशाद चौघुले(पुणे)वि.वि.सत्चित जामगावकर(पुणे) 3-0(64-02, 57-02, 65-33);
शुभोजित रॉय(मुंबई)वि.वि.स्वप्निल बिचे(पुणे) 3-2(47-33, 42-68, 51-40, 06-46, 64-59);
सुमित साळदुरकर(पुणे)वि.वि.अभिषेक बोरा(पुणे) 3-0(56-24, 68-52, 78-01).