पुणे: द पूना क्लब लिमिटेड आणि बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या संलग्नतेने आयोजित बीएसएएम सिक्स रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद 2019 स्पर्धेत सिद्धार्थ टेंबे, चैतन्य दिक्षीत, अश्विन पळणीतकर, पिनाक अनप या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून शानदार सुरुवात केली.
पूना क्लब येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत डबल एलिमनेशन फेरीत पहिल्या सामन्यात पुण्याच्या संकेत मुथा याने आपली विजयी मालिका कायम ठेवत पोरस शहाचा 4-2(39-03, 48-23, 12-36, 50-21, 14-31, 32-21) असा तर, दुसऱ्या सामन्यात संकेत याने आपला शहर सहकारी योगेश लोहियाचा 4-3(09-37, 43-32, 31-21, 37-21, 26-33, 40-63, 49-01) असा संघर्षपूर्ण पराभव करून तिसरा विजय मिळवला.
पुण्याच्या सिद्धार्थ टेंबे याने चिपळूणच्या ओंकार गोरेचा 4-1(19-50, 42-21, 35-07, 39-21, 39-26) असा पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली. नागपूरच्या चैतन्य दिक्षीत याने पुण्याच्या पंकज परमारचा 4-1(51-33, 27-19, 27-32, 39-06, 56-13) असा सहज पराभव करून विजय मिळवला. अतितटीच्या लढतीत पुण्याच्या पिनाक अनपने मुंबईच्या शुभोजित रॉयचा 4-3(37-10, 49-11, 57-16, 08-41, 01-48, 30-39, 40-30)असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: डबल एलिमनेशन फेरी:
संकेत मुथा(पुणे)वि.वि.पोरस शहा(एमजी) 4-2(39-03, 48-23, 12-36, 50-21, 14-31, 32-21);
अश्विन पळणीतकर(पुणे)वि.वि.चिंतामणी जाधव(कॉर्नर पॉकेट) 4-2(33-22, 34-01, 25-36, 16-48, 36-25, 34-01);
संकेत मुथा(पुणे)वि.वि.योगेश लोहिया(पुणे) 4-3(09-37, 43-32, 31-21, 37-21, 26-33, 40-63, 49-01);
पिनाक अनप(पुणे)वि.वि.शुभोजित रॉय(मुंबई) 4-3(37-10, 49-11, 57-16, 08-41, 01-48, 30-39, 40-30);
पोरस शहा(मुंबई)वि.वि.प्रशांत नातू(पुणे) 4-2(24-29, 52-21, 43-15, 48-20, 16-33, 44(40)-00);
सुरज राठी(मुंबई)वि.वि.अमरदीप घोडके(पुणे) 4-0(46-32, 54-25, 37-21, 36-05);
शाह्यान राझमी(मुंबई)वि.वि.माधव जोशी(पुणे) 4-2(50-19, 14-45, 37-04, 40-01, 32-38, 38-24);
सिद्धार्थ टेंबे(पुणे)वि.वि.ओंकार गोरे(चिपळूण) 4-1(19-50, 42-21, 35-07, 39-21, 39-26);
चैतन्य दिक्षीत(नागपूर)वि.वि.पंकज परमार(पुणे) 4-1(51-33, 27-19, 27-32, 39-06, 56-13).