पुणे- नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरिज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात दुस-या मानांकीत क्रिस नासाने आर्यन हुडचा तर मुलींच्या गटात अव्वल मानांकीत संजीवनी कुतवळने गार्गी फुलेचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लब, आयडियल कॉलनी, कोथरूड येथील टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत विजेतेपदासाठीच्या संघर्षपुर्ण लढतीत दुस-या मानांकीत
क्रिस नासाने आर्यन हुडचा 6-3, 3-6, 6-4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. उपांत्य फेरीच्या लढतीत क्रिसने पाचव्या मानांकीत आर्यन कोटस्थानेचा 9-5 असा पराभव केला होता. क्रिस डेली पब्लिक स्कुल येथे दहावी इयत्तेत शिकत असुन बाऊंस टेनिस अकादमी येथे केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. क्रिसचे या वर्षातील हे पहिलेच विजेतेपद आहे.
मुलींच्या गटात विजेतेपदाच्या लढतीत अव्वल मानांकीत संजीवनी कुतवळने गार्गी फुलेचा 6-2, 6-1 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. उपांत्य फेरीत संजीवनीने आशी छाजेडचा 9-2 असा पराभव केला होता. संजीवनी ग्रिन वुड स्कुल हडपसर येथे दहावी इयत्तेत शिकत असुन अजित सेन टेनिस अकादमी येथे अभय कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. संजीवनीचे या वर्षातील हे चौथे विजेतेपद आहे.
स्पर्धेतील विजेत्या व उपवित्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेते पारितोषिक वितरण मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लबचे संचालक शिवाजी चौधरी व शितल ओस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लबचे मुख्य कार्यकारी आधिकारी श्रेयस कदम, स्पर्धा सहाय्यक सौरभ जोशी व स्पर्धा संचालक नवनाथ शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुले: उपांत्य फेरी:
आर्यन हुड वि.वि अरिंदम बीट 9-5
क्रिस नासा(2) वि.वि आर्यन कोटस्थाने(5) 9-5
अंतिम फेरी- क्रिस नासा(2) वि.वि आर्यन हुड 6-3, 3-6, 6-4
मुली: उपांत्य फेरी:
संजीवनी कुतवळ(1) वि.वि आशी छाजेड 9-2
गार्गी फुले वि.वि काम्या परब 9-4