पुणे: आगामी ठाणे येथे(दि.12 ऑक्टोबर पासून)सुरु होणाऱ्या राज्यस्तरीय आंतर शालेय स्क्वॅश स्पर्धेसाठी पुणे विभागाचा संघ घोषित करण्यात आला. या संघात प्रामुख्याने जिल्ह्यातील खेळाडूंनी वर्चस्व राखले आहे.
डेव्हिड लॉयड क्लब, वाकड येथे विभागीय शालेय स्क्वॅश स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीवरून पुणे विभागाचा संघ निवडण्यात आला, अशी माहिती पुणे स्क्वॅश रॅकेट संघटनेचे अध्यक्ष कालिदास मगर आणि पुणे स्क्वॅश रॅकेट संघटनेचे सचिव आनंद लाहोटी यांनी दिली. क्रिडा व सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्यचे सहसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, पुणे जिल्हा क्रिडा आधिकारी विजय संतान यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डेव्हिड लॉयड क्लबचे सरव्यवस्थापक अनिश श्रीवास्तव, क्रिडा अधिकारी शिवाजी कोळी, प्रो स्क्वॅश अकादमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश पोतदार आदींनी पुढाकार घेतला.
पुण्याचे विविध गटांतील स्क्वॅश संघ असे:
14 वर्षाखालील मुली
तान्या अहुजा(सेंट मेरीज स्कुल, पुणे), गायत्री सोनटक्के(श्री.वर्धन विद्या महाविद्यालय, पुणे), श्रृती कोटा(रामदास नरसय्या इप्पाकायल प्रा.शाळा, सोलापुर), प्रहालिका निवर्थी(इंदिरा नॅशनल स्कुल, पुणे), गौरी भुजाडी(सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, राहुरी)
14 वर्षाखालील मुले
अर्णव नाडकर्णी(दिल्ली पब्लिक स्कुल, पुणे), अनंत फिरोदीया(सेंट मेरीज स्कूल, पुणे), रोनीत पाटील(भारत चिल्ड्रेन्स ऑकेडमी ऑन्ड ज्युनियर कॉलेज, वालचंदनगर), विवान रांका(सेंट मेरीज स्कूल, पुणे)
17 वर्षाखालील मुली
अपराजिता सिंग(इंडस इंटरनॅशनल स्कूल, भुगाव), संध्या डोंगेस्वामी(श्री.वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य हायस्कुल, सोलापुर), हावडा भानपुरावाल(विबग्योर हायस्कुल, पुणे), दिया सांकला(सेंट मेराज स्कूल, पुणे), नंदिनी जाधव(गांधीनाथ रंगजी इंग्लीश मिडीयम स्कुल, सोलापुर)
17 वर्षाखालील मुले
करण पटेल(इंडस इंटरनॅशनल स्कूल, पुणे), कियान लॉयर(सेंट मेरीज स्कूल, पुणे), प्रियंक शिधये(विखे पाटील मेमोरीयल स्कूल, पुणे), मानस सिंह(इंदिरा नॅशनल स्कूल, पुणे), रायत इक्बाल कोतवाल(सेंट मेरीज स्कूल, पुणे)
19 वर्षाखालील मुली
श्रृती माने(सिंबायोसीस कॉलेज ऑफ आर्टस ऑन्ड कॉमर्स, पुणे), समृध्दी कदम(गांधीनाथ रंगजी हायस्कूल, सोलापुर), तनुजा झुरंगे(समाजभुषण संभाजीराव भुजबळ विद्यालय, शिरूर), ईश्वरी फपाळ(श्रीमती शे.दे.गणगे प्रशाला, चिंचवड, पुणे), जोत्सना मदने(संगमेश्वर कॉलेज, सोलापुर)
19 वर्षाखालील मुले
अर्श चड्डा(सरदार दस्तुर हायस्कूल, पुणे), वैभव बुरबुरे(गांधीनाथ रंगजी इंग्लीश मिडीयम स्कुल, सोलापुर), नागोराव वाटोडे(श्री. म्हाळसाकांत विद्यालय, आकूर्डी), सौरव शेंडे(नुतन विद्यालय हायस्कुल, सोलापुर), आनंद कडगंची( गांधीनाथ रंगजी इंग्लीश मिडीयम स्कुल, सोलापुर)