पुणे, 11 ऑक्टोबर 2019: ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित 8, 10,12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए-केपीआयटी व आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेत सुमित उंद्रे, सान्वी देवरे, सक्षम भन्साळी , रिषीता पाटील, शादृल खवले , सान्वी मिश्रा , इशान देगमवार व आस्मी आडकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत 8 वर्षाखालील मुलांच्या गटात सुमित उंद्रेने सर्वज्ञ सरवदेचा 7-5 असा तर मुलींच्या गटात सान्वी देवरेने श्रृष्टी सुर्यवंशीचा 7-2 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. 10 वर्षाखालील मुलांच्या गटात सक्षम भन्साळीने वैष्णव रानवडेचा 7-1 असा तर मुलींच्या गटात रिषीता पाटीलचा सिध्दी मिश्राचा 7-3 असा पराभव केला.
12 वर्षाखालील मुलांच्या गटात शादृल खवलेने चिराग चौधरीचा 5-3, 4-1 असा तर मुलींच्या गटात सान्वी मिश्राने रिषीता पाटीलचा 5-3, 4-0 असा पराभव केला. 14 वर्षाखालील मुलांच्या गटात इशान देगमवारने पार्थ देवरुखकरचा 4-0, 4-0 असा तर मुलींच्या गटात आस्मी आडकरने अलिना शेखचा 4-1, 4-1 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी-
8 वर्षाखालील मुले- सुमित उंद्रे वि.वि सर्वज्ञ सरवदे 7-5
8 वर्षाखालील मुली- सान्वी देवरे वि.वि श्रृष्टी सुर्यवंशी 7-2
10 वर्षाखालील मुले- सक्षम भन्साळी वि.वि वैष्णव रानवडे 7-1
10 वर्षाखालील मुली- रिषीता पाटील वि.वि सिध्दी मिश्रा 7-3
12 वर्षाखालील मुले- शादृल खवले वि.वि चिराग चौधरी 5-3, 4-1
12 वर्षाखालील मुली- सान्वी मिश्रा वि.वि रिषीता पाटील 5-3, 4-0
14 वर्षाखालील मुले- इशान देगमवार वि.वि पार्थ देवरुखकर 4-0, 4-0
14 वर्षाखालील मुली- आस्मी आडकर वि.वि अलिना शेख 4-1, 4-1