पुणे: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व फ्युचर प्रो टेनिस अकादमी यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप ब्रॉन्झ सिरीज मानांकन टेनिस 2019 स्पर्धेत 12 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात अनुक्रमे तेज ओक, श्रावणी देशमुख यांनी तर, 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात सार्थ बनसोडे व सिमरन छेत्री या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
येरवडा येथील फ्युचर प्रो टेनिस अकादमीच्या टेनिस कोर्टवर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात बिगरमानांकीत तेज ओक याने अव्वल मानांकित अद्विक नाटेकरचा 4-2, 4-1 असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. तेज हा सिम्बायोसिस शाळेत सहावी इयत्तेत शिकत असून बाऊन्स टेनिस अकादमीमध्ये प्रशिक्षक केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे या वर्षातील या गटातील हे तिसरे विजेतेपद आहे. मुलींच्या गटात बिगर मानांकीत श्रावणी देशमुखने आपली विजयी मालिका कायम ठेवत चौथ्या मानांकित मृणाल शेळकेचा 4-1, 2-4, 4-0असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद मिळवले. श्रावणी ही सिंहगड स्प्रिंगडेल शाळेत आठवी इयत्तेत शिकत असून महाराष्ट्रीय मंडळमध्ये प्रशिक्षक धरणीधर मिश्रा आणि सिंहगड इन्स्टिटयूटमध्ये प्रशिक्षक राजेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
मृणाल शेळके(4)वि.वि.अनुष्का 7-1;
तेज ओक वि.वि. अर्णव बनसोडे(5)7-4;
अंतिम फेरी: तेज ओक वि.वि.अद्विक नाटेकर(1)4-2, 4-1;
14 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
सिमरन छेत्री(5) वि.वि. देवांशी प्रभुदेसाई(7) 7-5;
श्रावणी देशमुख वि.वि.संचिता नगरकर 7-6(7-5);
सार्थ बनसोडे(2) वि.वि. अभिराम निलाखे 7-2;