डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीच्या चुरशीच्या झालेल्या लढतीत पहिल्या 8वर्षाखालील मिश्र गटात विपार स्पिडिंग चिताजच्या नमिश हूडने फ्लाईंग हॉक्सच्या अंशूल पुजारीचा 4-1 असा पराभव केला., तर 10वर्षाखालील मुलांच्या गटात विपार स्पिडिंग चिताजच्या नीरज जोर्वेकरला फ्लाईंग हॉक्सच्या सक्षम भन्साळीने 0-4असे पराभूत करून संघाला बरोबरी साधून दिली. 10वर्षाखालील मुलींच्या गटात विपार स्पिडिंग चिताजच्या ध्रुवी आदयंता हिने किया तेलंगला 4-1 असे पराभूत केले. त्यानंतर12वर्षाखालील मुलांच्या गटात फ्लाईंग हॉक्सच्या तेज ओकने अर्चित धूतवर 6-4 असा विजय मिळवला.
12वर्षाखालील मुलींच्या गटात विपार स्पिडिंग चिताजच्या सलोनी परिदाने अंजली निंबाळकरचा 6-3 असा तर,14वर्षाखालील मुलांच्या गटात ईशान देगमवारने फ्लाईंग हॉक्सच्या पार्थ देवरूखकरचा 6-1 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. पण हि आघाडी फार विपार स्पिडिंग चिताज संघाला टिकवता आली नाही. 14वर्षाखालील मुलींच्या गटात फ्लाईंग हॉक्सच्या :श्रावणी देशमुखने अलिना शेखचा 6-3 असा तर, कुमार दुहेरी गटात अर्जुन किर्तने व तनिश बेलगळकर यांनी विपार स्पिडिंग चिताजच्या कृष्णा घुवलेवाला व वेदांग काळे यांचा 6-3असा पराभव करून संघाचे आव्हान कायम राखले. त्यानंतर 14वर्षाखालील मुलांच्या दुहेरी गटात फ्लाईंग हॉक्सच्या सुधांशू सावंत व श्लोक गांधी या जोडीने ऐतरेत्या राव व केयूर म्हेत्रे यांचा 6-4असा पराभव करून हि आघाडी वाढवली. पण उर्वरित दोन सामन्यात 10वर्षाखालील मुलांच्या दुहेरीत चिताजच्या रियान माळीने वेद मोघेच्या साथीत .नीव कोठारी व रोहन बजाज यांचा टायब्रेकमध्ये 4-3(6) असा तर, मिश्र दुहेरीत विपार स्पिडिंग चिताजच्या नाव्या भामिदिप्ती व विश्वजीत सणस यांनी कौशिकी समंथा व अवनीश गवळी यांचा 6-5(5) असा पराभव करून संघाचा विजय सुकर केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
विपार स्पिडिंग चिताज वि.वि.फ्लाईंग हॉक्स 44-42(एकेरी: 8वर्षाखालील मिश्र गट: नमिश हूड वि.वि.अंशूल पुजारी 4-1; 10वर्षाखालील मुले: नीरज जोर्वेकर पराभूत वि.सक्षम भन्साळी 0-4; 10वर्षाखालील मुली: ध्रुवी आदयंता वि.वि.किया तेलंग 4-1; 12वर्षाखालील मुले: अर्चित धूत पराभूत वि.तेज ओक 4-6; 12वर्षाखालील मुली: सलोनी परिदा वि.वि.अंजली निंबाळकर 6-3; 14वर्षाखालील मुले: ईशान देगमवार वि.वि.पार्थ देवरूखकर 6-1; 14वर्षाखालील मुली: अलिना शेख पराभूत वि.श्रावणी देशमुख 3-6; कुमार दुहेरी गट: कृष्णा घुवलेवाला/वेदांग काळे पराभूत वि.अर्जुन किर्तने/तनिश बेलगळकर 3-6; 14वर्षाखालील मुले दुहेरी गट: ऐतरेत्या राव/केयूर म्हेत्रे पराभूत वि.सुधांशू सावंत/श्लोक गांधी 4-6; 10वर्षाखालील मुले दुहेरी: रियान माळी/वेद मोघे वि.वि.नीव कोठारी/रोहन बजाज 4-3(6); मिश्र दुहेरी: नाव्या भामिदिप्ती/विश्वजीत सणस वि.वि.कौशिकी समंथा/अवनीश गवळी 6-5(5));