टेनिस स्पर्धेत नील केळकर, काव्या देशमुख यांना विजेतेपद
पुणे: नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमी यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या द क्रिएशन करंडक एमएसएलटीए राज्य मानांकन 10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात काव्या देशमुख हिने, तर मुलांच्या गटात नील केळकर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लब, आयडियल कॉलनी, कोथरूड येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत 10 वर्षाखालील मुलींच्या गटात दुसऱ्या मानांकित काव्या देशमुखने अव्वल मानांकित नम्रता पवारचा 4-2, 5-3 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. काव्या ही पाचवी इय्यतेत डीवाय पाटील शाळेत शिकत असून पीसीएमसी टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक मनोज कुसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित नम्रता पवारने तिसऱ्या मानांकित व्रणदिका राजपूतचा 6-4 असा तर, दुसऱ्या मानांकित काव्या देशमुखने चौथ्या मानांकित ह्रितिका कापलेचा 6-3 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या सामन्यात बिगरमानांकित नील केळकरने सातव्या मानांकित मनन अगरवालचा 4-1, 4-0असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. नील हा सिम्बायोसिस शाळेत चौथी इय्यतेत शिकत असून त्याचे हे या वर्षातील या गटातील चौथे विजेतेपद आहे.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण द क्रिएशनचे शिवाजी चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक नवनाथ शेटे, प्रवीण धनवे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 10वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:
नील केळकर वि.वि.शिवतेज श्रीफुले 6-4;
मनन अगरवाल(7)वि.वि.शार्दुल खवळे(8) 6-5(4);
अंतिम फेरी: नील केळकर वि.वि.मनन अगरवाल(7) 4-1, 4-0;
10वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
नम्रता पवार(1)वि.वि.व्रणदिका राजपूत(3)6-4;
काव्या देशमुख(2)वि.वि.ह्रितिका कापले(4) 6-3;
अंतिम फेरी: काव्या देशमुख(2)वि.वि.नम्रता पवार(1) 4-2, 5-3.