पुणे: नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमी यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या द क्रिएशन करंडक एमएसएलटीए राज्य मानांकन 10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात बिगर मानांकीत शिवतेज श्रीफुलेने अव्वल मनांकीत दिवीज पाटीलचा तर आठव्या मानांकीत शार्दूल खवळेने दुस-या मानांकीत ओम वर्माचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लब, आयडियल कॉलनी, कोथरूड येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात उपांत्यपुर्व फेरीत बिगर मानांकीत शिवतेज श्रीफुलेने अव्वल मनांकीत दिवीज पाटीलचा 6-3 तर आठव्या मानांकीत शार्दूल खवळेने दुस-या मानांकीत ओम वर्माचा 6-1 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. चौथ्या मानांकीत नील केळकरने स्वरनीम येवलेकरचा 6-1 असा तर, सातव्या मानांकीत मनन अगरवालने राम मगदुमचा 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.
मुलींच्या गटात अव्वल मानांकीत नम्रता पवारने रित्सा कोंडकरचा 6-5(1) असा टायब्रेकमध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली. दुस-या मानांकीत काव्या देशमुखने आस्मि टिळेकरचा 6-3 असा तर, तिस-या मानांकीत व्रंदीका राजपुतने इमान विरजीचा 6-4 असा पराभव केला. चौथ्या मानांकीत ह्रितिका कापलेने रिशिता पाटीलचा 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपुर्व फेरी: 10वर्षाखालील मुले:
शिवतेज श्रीफुले वि.वि. दिवीज पाटील(1)6-3
नील केळकर(4)वि.वि. स्वरनीम योवलेकर 6-1
मनन अगरवाल(7) वि.वि राम मगदुम 6-3
शार्दूल खवळे(8) वि.वि ओम वर्मा (2) 6-1
10वर्षाखालील मुली:
नम्रता पवार(1) वि.वि रित्सा कोंडकर 6-5(1)
काव्या देशमुख(2) वि.वि आस्मि टिळेकर 6-3
व्रंदीका राजपुत(3) वि.वि इमान विरजी 6-4
ह्रितिका कापले(4) वि.वि. रिशिता पाटील 6-4