पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित आठव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत इलाईट डिव्हिजन गटात एफसी अ आणि मंदार वाकणकर टेनिस अकादमी(एमडब्लूटीए) अ या संघांनी अनुक्रमे लॉ कॉलेज लायन्स व महाराष्ट्र मंडळ संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत एफसी अ संघाने लॉ कॉलेज लायन्स संघावर 24-09 असा विजय मिळवत आगेकूच केली. एफसी अ संघाकडून संजय रासकर, संग्राम चाफेकर, गणेश देवखिळे, पुष्कर पेशवा, पंकज यादव, सचिन साळुंखे, वैभव अवघडे यांनी अफलातून कामगिरी बजावली. उपांत्य फेरीत एफसी अ संघाचा सामना पीवायसी अ संघाशी होणार आहे.
दुसऱ्या सामन्यात राजेश मंकणी, प्रवीण पांचाळ, मंदार वाकणकर, अमित किंडो, जयदीप वाकणकर, निलेश ओस्तवाल, सुनील लुल्ला, आशिष मणियार यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर मंदार वाकणकर टेनिस अकादमी अ संघाने महाराष्ट्र मंडळला 24-08 असे पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत एमडब्लूटीए अ संघासमोर पीवायसी ब संघाचे आव्हान असणार आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: इलाईट डिव्हिजन: उपांत्यपूर्व फेरी:
एफसी अ वि.वि.लॉ कॉलेज लायन्स 24-09(100अधिक गट: संजय रासकर/संग्राम चाफेकर वि.वि.केतन जाठर/श्रीकृष्णा पानसे 6-4; खुला गट: संग्राम चाफेकर/गणेश देवखिळे वि.वि.राहुल पंढरपुरे/प्रोफेसर.जयभाई 6-1; 90अधिक गट: पुष्कर पेशवा/पंकज यादव वि.वि.शिवाजी यादव/अभिजित मराठे 6-1; खुला गट: सचिन साळुंखे/वैभव अवघडे वि.वि.तारख पारीख/केतन जाठर 6-3);
एमडब्लूटीए अ वि.वि.महाराष्ट्र मंडळ 24-08(100अधिक गट: राजेश मंकणी/प्रवीण पांचाळ वि.वि.संजय सेठी/अर्जुन वाघमारे 6-3; खुला गट: मंदार वाकणकर/अमित किंडो वि.वि.अभिषेक चव्हाण/रवींद्र देशमुख 6-2; 90अधिक गट: जयदीप वाकणकर/निलेश ओस्तवाल वि.वि.कमलेश शाह/विकास बचलू 6-2; खुला गट: सुनील लुल्ला/आशिष मणियार वि.वि.संजय सेठी/अर्पित श्रॉफ 6-1).