व्हिजन क्रिकेट अकादमी मौदान येथे झालेल्या सामन्यात परेश दहिवालच्या जलद 60 धावांच्या बळावर आयडीयाज् अ सास कंपनी संघाने कॅपजेमिनि संघाचा 8 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना परेश दहिवालच्या केवळ 36 चेंडूत 60 धावांच्या बळावर आयडीयाज् अ सास कंपनी संघाने 20षटकात 7 बाद 178 धावा केल्या. श्रीकांत जयरामनने 23, प्रसाद कुंटेने 21 व अरूण सिंगने 25 धावा करून परेशला सुरेख साथ दिली. 178 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमोल चौधरीच्या अचूक गोलंदाजीने कॅपजेमिनि संघाचा डाव 20 षटकात 7 बाद 170 धावांत रोखला. यात संकेत देशपांडेने 45 धावा करून संघाचा डावाला आकार दिला. 60 धावा करणारा परेश दहिवाल सामनावीर ठरला.दुस-या लढतीत प्रभज्योत मल्होत्राच्या 79 धावांच्या बळावर इन्फोसीस संघाने सनगार्ड संघाचा 85 धावांनी पराभव करत उद्घाटनाचा दिवस गाजवला. पहिल्यांदा खेळताना इन्फोसीस संघाने 20 षटकात 6 बाद 192 धावांचा डोंगर रचला. प्रभज्योत मल्होत्राने 46 चेंडूत 79 धावा करून संघाचा डाव भक्कम केला. संजय पुरोहीतने 34 चेंडूत 47 धावा करून प्रभज्योतला सुरेख साथ दिली. 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रवी थापलीयार व सागर दुबे यांच्या आक्रमक गोलंदाजूपुढे सनगार्ड संघ 19.2 षटकात सर्वबाद 107 धावांत गारद झाला. प्रभज्योत मल्होत्रा सामनावीर ठरला.
स्पर्धेचे उद्घाटन आयडीयाज् अ सास कंपनीचे संचालक प्रशांत केएस, आयडीयाज् अ सास कंपनीचे माजी संचालक व उपाध्यक्ष राजीव नाशिककर, आयडीयाज् अ सास कंपनीच्या फायनान्स् हेड मल्लिका जेम्स्, अंकुर जोगळेकर मेमोरीअल फाऊंडेशनचे उपअध्यक्ष विजय जोगळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
आयडीयाज् अ सास कंपनी – 20षटकात 7 बाद 178 धावा(परेश दहिवाल 60(36), श्रीकांत जयरामन 23(20), प्रसाद कुंटे 21(15), अरूण सिंग 25(20), विक्रांत बांगर 3-32) वि. वि कॅपजेमिनि- 20 षटकात 7 बाद 170 धावा(संकेत देशपांडे 45(33), फनिंद्र पायला 21(27), अंकुश महासाहेब 40(23), अमोल चौधरी 3-27) सामनावीर- परेश दहिवाल
आयडीयाज् अ सास कंपनी संघाने 8 धावांनी सामना जिंकलाइन्फोसीस- 20 षटकात 6 बाद 192 धावा(प्रभज्योत मल्होत्रा 79(46), संजय पुरोहीत 47(34), मेहबुब शोख 23(17), थॉमसन शोरॉन 24(12), सुमित चोपडे 2-28, पवन आनंद 2-33) वि.वि सनगार्ड- 19.2 षटकात सर्वबाद 107 धावा(पार्थ शर्मा 47(29), रवी थापलीयार 4-11, सागर दुबे 3-26) सामनावीर- प्रभज्योत मल्होत्रा
इन्फोसीस संघाने 85 धावांनी सामना जिंकला.