तिसऱ्या पूना क्लब फुटबॉल लीग स्पर्धेत गेट मेस्सी, कोक इन कॅन, झाल्टन ऑफ स्विंग संघांची विजयी सलामी
पुणे: पूना क्लब तर्फे आयोजित तिसऱ्या पूना क्लब फुटबॉल लीग स्पर्धेत गेट मेस्सी, कोक इन कॅन, झाल्टन ऑफ स्विंग, आऊट ऑन बेल , ड्युक्स ऑफ हजार्ड व मार्क ओ पिर्लो या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली.
पूना क्लब फुटबॉल मौदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ब्रेंडनने केलेल्या एका गोलाच्या जोरावर गेट मेस्सी संघाने ऑफ ओझील संघाचा 1-0 असा पराभव करत उद्घाटनाचा दिवस गाजवला. सुरज राठीने केलेल्या दोन गोला व यश लुंबा यांच्या एका गोलासह कोक इन कॅन संघाने ऍबसुलेटली फॅब्रिगेस संघाचा 3-1 असा पराभव केला.
निर्भय शर्माच्या हॉट्रीक कामगिरीच्या जोरावर ड्युक्स ऑफ हजार्ड संघाने रॉनी ट्यून्स संघाचा 3-2 असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
कोक इन कॅन -3(सुरज राठी 3,7 मी, यश लुंबा 12मी) वि.वि ऍबसुलेटली फॅब्रिगेस-1(वेदांत मेहता 9मी)
झाल्टन ऑफ स्विंग -2(अखलाक पुनावाला 7मी, गुनिश बेदी 14मी) वि.वि शुगर केन- 1(अर्णव लुल्ला 4मी)
गेट मेस्सी -1(ब्रेंडन 13मी) वि.वि विझार्ड ऑफ ओझील-0
आऊट ऑन बेल -4(राहिल मर्चंदानी 7, 12मी, अक्षय चोपडा 9मी, कपिल सावंत 14मी) वि.वि सुअरेज बाईट्स- 2(वेद जैन 5मी, आदित्य गांधी 11मी)
ड्युक्स ऑफ हजार्ड – 3(निर्भय शर्मा 4,7,10मी) वि.वि रॉनी ट्यून्स- 2(रोहित जाधव 6,13मी)
मार्क ओ पिर्लो – 4(अमजद अक्कलकोटकर 4,7,10,14मी) वि.वि रोनाल्डो नट्स-2(कृष्णा जैन 3मी, राक्षय ठक्कर 12मी)