पाचगणी-रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील अखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या दक्ष अगरवाल याने, तर मुलींच्या गटात रिया भोसले या खेळाडूंनी मानांकित खेळाडूवर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 16वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या बिगारमानांकीत दक्ष अगरवाल सहाव्या मानांकित आपला राज्य सहकारी यशराज दळवीचा 6-0, 6-3असा पराभव करून करून अनपेक्षित निकाल नोंदविला. अव्वल मानांकित फैज नस्याम याने प्रसाद इंगळेवर 6-4, 4-6, 6-2असा तीन सेटमध्ये विजय मिळवला. आठव्या मानांकित अर्जुन गोहडने साहेब सोधीचे आव्हान 6-3, 4-6, 6-2 असे संपुष्टात आणले.
मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या रिया भोसले हिने तेलंगणाच्या पाचव्या मानांकित आरणी येल्लूचा 6-2, 6-4असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिसऱ्या मानांकित राधिका महाजनने श्रावणी खवळेला 6-3, 6-4असे नमवित आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: 16वर्षाखालील मुले:
फैज नस्याम(महा)(1)वि.वि.प्रसाद इंगळे(महा)6-4, 4-6, 6-2;
दक्ष अगरवाल(महा)वि.वि.यशराज दळवी(महा)(6)6-0, 6-3;
आदित्य नांदल(हरियाणा)(4)वि.वि.अर्जुन चॅटर्जी(महा)6-3, 3-6, 6-0;
अर्जुन गोहड(महा)(8)वि.वि.साहेब सोधी(महा) 6-3, 4-6, 6-2;
करीम खान(महा)वि.वि.प्रणव गाडगीळ(महा) 6-1, 6-0;
सर्वेश बिरमाने(महा)(3)वि.वि.आर्यन शहा(महा)6-4, 6-0;
आयुश भट(कर्नाटक)(5)वि.वि.मानस धामणे(महा) 6-1, 4-6, 6-3;
ऋषी जलोटा(चंदीगड)(2)वि.वि.सिद्धार्थ जडली6-4, 3-6, 6-4;
16वर्षाखालील मुली:
आदिती आरे(तेलंगणा)(1)वि.वि.परी चव्हाण(महा)6-4, 7-5;
बान्ही पांचाळ(गुजरात)(7)वि.वि.जिया परेरा(महा)6-1, 6-0;
मधुरिमा सावंत(महा)वि.वि.स्वरा काटकर(महा) 6-2, 6-1;
हर्षिता बांगेरा(महा)(8)वि.वि.स्नेहा रानडे(महा) 6-3, 6-2;
रिया भोसले(महा)वि.वि.आरणी येल्लू(तेलंगणा)(5) 6-2, 6-4;
राधिका महाजन(महा)(3)वि.वि.श्रावणी खवळे(महा) 6-3, 6-4;
वैष्णवी वकीती(तेलंगणा)वि.वि.सिया देशमुख(महा) 6-1, 3-6, 7-5;
सायना देशपांडे(महा)वि.वि.सानिया मोरे(महा) 6-3, 6-1.