पुणे: पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित तिसऱ्या आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत आर्यन घाटगे, पार्थ चाफळे, केयूर म्हेत्रे, अर्जुन कीर्तने, आदित्य आयंगर, मानस गुप्ता यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत 12वर्षाखालील मुलांच्या गटात चौथ्या मानांकित आर्यन घाटगेने आर्यन परबचा 6-0असा तर, आठव्या मानांकित अर्जुन कीर्तनेने सर्वेश इजंटकरचा 6-0असा पराभव करून आगेकूच केली. बाराव्या मानांकित आदित्य आयंगरने तनिष्क सोनारचा 6-2असा सहज पराभव केला. अव्वल मानांकित पार्थ देवरूखकरने पार्थ मानपाठकचा 6-1असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: 12वर्षाखालील मुले:
आर्यन घाटगे(4)वि.वि.आर्यन परब 6-0;
अर्जुन कीर्तने(8)वि.वि.सर्वेश इजंटकर6-0;
आदित्य आयंगर(12)वि.वि.तनिष्क सोनार 6-2;
पार्थ चाफळे(6)वि.वि.लव्य बलदोटा 6-2;
पार्थ देवरूखकर(1)वि.वि.पार्थ मानपाठक 6-1;
पियुष जाधव(5)वि.वि.अर्जुन कलाटे6-3;
केयूर म्हेत्रे(3)वि.वि.वेदांत चव्हाण 6-0;
अर्चित धूत(10)वि.वि.दिपित वर्तक 6-4;
सूर्या काकडे(13)वि.वि.श्रीधर जलवादीमथ 6-4;
मानस गुप्ता(7)वि.वि.आर्यन रायजादे 6-2;
अर्णव बनसोडे(11)वि.वि.तन्मय सिसोडे 6-0.