पुना क्लब क्रिकेट मैदान व पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत नमन शर्मा नाबाद 38 धावांच्या बळावर कॅग्निझंट संघाने कॉपजेमिनि संघाचा 3 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना फनेंद्र पाईलाच्या नावाब 42 धावांसह कॉपजेमिनि संघाने 20 षटकात 4 बाद 144 धावा केल्या. 144 धावांचे लक्ष कॅग्निझंट संघाने 2चेंडूू बाकी असताना 7 बाद 148 धावांसह पुर्ण केले. यात प्रथमेश देशपांडेने 32 तर पुनित करणने 34 धावा करून नमनला सुरेख साथ दिली.नमन शर्मा सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत स्वप्निल अवळे नाबाद 67 धावांच्या जोरावर सेल 2 वर्ल्ड संघाने आयडीयाज् अ सास कंपनी संघाचा 55 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना सेल 2 वर्ल्ड संघाने 20 षटकात 7 बाद 150 धावा केल्या. यात रोशन धांगडेने 47 धावांची सुरेख खेळी केली. 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अक्षय पैलवान व रोहन लुनावत यांच्या अचूक गोलंदाजीपुढे आयडीयाज् अ सास कंपनी संघ 16.2 षटकात सर्वबाद 95 धावांत गारद झाला. यात प्रशांत कुंटेची अर्धशतकी खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. स्वप्निल अवळे सामनावीर ठरला.
अनंद कोंडाच्या अचूक गोलंदीजीच्या जोरावर इन्फोसिस संघाने विप्रो संघाचा 141 धावांनी पराभव करत धुव्वा उडवला. पहिल्यांदा खेळताना इन्फोसिस संघाने 20 षटकात 9 बाद 194 धावा केल्या. यात संदिप शांघाय 65 धावा करून संघाचा डाव बळकट केला. 194 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनंद कोंडाच्या अचूक गोलंदाजीपुढे विप्रो- संघ केवळ 13.5 षटकात सर्वबाद 53 धावांत गारद झाला. 13 धावात 3 बळी घेणारा अनंद कोंडा सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
कॉपजेमिनि- 20 षटकात 4 बाद 144 धावा(गिरिष बोरा 30, दिपक कुमार नाबाद 34, फनेंद्र पाईला नावाब 42, कौनाईन लखानी 3-38) पराभूत वि कॅग्निझंट- 19.4 षटकात 7 बाद 148 धावा(प्रथमेश देशपांडे 32, पुनित करण 34, नमन शर्मा नाबाद 38, दिपक कुमार 2-30, चंद्रमैली रेड्डी 2-22, शशांक त्रिवेदी 2-21) सामनावीर- नमन शर्मा
कॅग्निझंट संघाने 3 गडी राखून सामना जिंकला.
सेल 2 वर्ल्ड- 20 षटकात 7 बाद 150 धावा(रोशन धांगडे 47, स्वप्निल अवळे नाबाद 67, निर्झर दने 2-24, निहार जोशी 2-11) वि.वि आयडीयाज् अ सास कंपनी- 16.2 षटकात सर्वबाद 95 धावा(प्रशांत कुंटे 50, अक्षय पैलवान 3-20, रोहन लुनावत 3-16) सामनावीर- स्वप्निल अवळे
सेल 2 वर्ल्ड संघाने 55 धावांनी सामना जिंकला.
इन्फोसिस- 20 षटकात 9 बाद 194 धावा(प्रभज्योत सिंग 31, संदिप शांघाय 65, करण पांड्या 26, निलेश गायकवाड 22, बादल तांबोळी 3-16) वि.वि विप्रो- 13.5 षटकात सर्वबाद 53 धावा(मिहिर देसाई 21, अनंद कोंडा 3-13, रवी थापलीयाल 2-8) सामनावीर- अनंद कोंडा
इन्फोसिस संघाने 141 धावांनी सामना जिंकला.